इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पाडव्याच्या नवचैतन्यात कोरोनाचे मळभ धुवून निघावेत - धनंजय मुंडे* *गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*

 *पाडव्याच्या नवचैतन्यात कोरोनाचे मळभ धुवून निघावेत - धनंजय मुंडे*



*गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*


बीड (दि. १२) ----:  चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी वसंत ऋतूचे आगमन व गुढी पाडव्याच्या चैतन्यामध्ये कोरोनाचे मळभ धुवून निघावेत व नवी चैतन्यमयी, समृद्ध व आरोग्यदायी सकाळ सर्वांच्या आयुष्यात यावी, अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गुढी पाडवा व मराठी नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी सततचा लॉकडाऊन आणि कोरोना यापासून मुक्तीची असो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला व निसर्गामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या बदलांचे उत्साहाने स्वागत करण्याचा हा सण आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सामुहिकपणे साजरा करता येत नसला तरी, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन यंदा गुढीपाडवा साधेपणानं साजरा करुया. कोरोनाचे हे मळभ दूर झाल्यानंतर पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!