MB NEWS-नाभिक समाजाला लाॅकडाऊन मध्ये शिथिलता द्या व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला शासकीय मदत द्या---- शरद कावरे

 नाभिक समाजाला लाॅकडाऊन मध्ये शिथिलता द्या व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला शासकीय मदत द्या- शरद कावरे      


            

                   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून विविध व्यवसाय सुरू ठेवून सलुन व्यवसाय मात्र लाॅकडाऊन च्या नावाखाली बंद केले आहेत त्यामुळे हातावर पोट असणारे  नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे तत्काळ सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला तत्काळ  शासकीय मदत द्यावी व त्या कुटुंब योग्य तो न्याय द्यावा आशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या परळी च्या वतीने निवेदना द्वारे मा.उपविभागीय अधिकारीसाहेब परळी वै. तसेच तहसीलदार साहेब परळी वै.व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्य़ाचे पालक मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कडे करण्यात आली आहे.

              लाॅकडाऊन च्या नावाखाली विविध व्यवसाय सुरू असताना नाभिक समाजाच्या सलुन व्यवसाय मात्र पुर्णपणे बंद करण्यात आला आहे .हे व्यवसाय बंद केल्याने नाभिक समाजावरील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीही 3 ते 4 महिने हा व्यवसाय बंद होता व पुन्हा हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याने नाभिक समाज आथिर्क दृष्टया अडचणीत आला आहे त्यामुळेच नाभिक समाजावर अत्यंमहात्या करण्याची वेळ आली आहे तरीही शासनाने इतर व्यवसाया प्रमाणे नियमाचे व निर्बंधाचे पालन करत सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी व मयत मनोज झेंडेला मदत करावी व तत्काळ सलुन व्यवसाय सुरू करावेत आशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळा चे मार्गदर्शक श्री शरद कावरे व शहर अध्यक्ष श्री प्रभाकरजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील निवेदन देण्यात आले यावेळेस हारीभाऊ घुले ,बंजरग चोपडे,महादेव वाघमारे ,राधाकृष्ण कांबळे,अनिल गवळी,कपिल मुळे ,मुळे,अंजय राऊत  इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार