इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS -आजच्या अहवालात 1005 जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

 आजच्या अहवालात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह !



विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन


परळी – दि 15 प्रतिनिधी


जिल्ह्यात शुक्रवार दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील  3655 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर  2650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे


आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 142,आष्टी 168,बीड 348,गेवराई 67

माजलगाव 60,परळी 29, धारूर 29, केज 98, शिरूर 21

पाटोदा 21, वडवणी 22

परळी शहरात शुक्रवारी केवळ एक रुग्ण तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आढळून आले अंबाजोगाई शहरात दररोज द्विशतक पूर्ण होत असताना शुक्रवारी 142 रुग्ण आढळून आल्याने समाधानकारक परिस्थिती पहावयास मिळाली.

यातच शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!