पोस्ट्स

MB NEWS-राज्य सरकारने तात्काळ कोर्टात शपथपत्र दाखल करून निवडणुका पुढे ढकलाव्या*

इमेज
 * राज्य सरकारने तात्काळ कोर्टात शपथपत्र दाखल करून निवडणुका पुढे ढकलाव्या*  * लोणावळ्यातील ओबीसींच्या सर्वपक्षीय बैठकीत पंकजाताई मुंडे यांची मागणी* *इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचेच*  मुंबई । दिनांक २७।  जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षणाचे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पाच जुलैच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलाव्यात, त्यासाठी सरकारने कोर्टात तात्काळ शपथपत्र दाखल करावे अशी मागणी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी लोणावळा येथे ओबीसी व्हीजेएनटी मंथन चिंतन शिबिर येथे बोलतांना केली. मराठा समाजाचा प्रश्न शैक्षणिक आरक्षणाचा असून हा समाज राजकीयदृष्ट्या पुढारलेला आहे.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.त्यामुळे,दोन्ही समाजात कोणीही गैरसमजाची भिंत उभी करून वाद निर्माण करू नये अशी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे,असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाला की,या ठिकाणी आल्यावर मला अनेक पत्रकार म्हणाले काल तुम्ही आंदोलन केले आज चिंतन करत आहात.काल संपुर्ण महाराष्ट्राने ओबीसींचे चक्काजाम आंदोलन पाहिले.जर विचार

MB NEWS-देशी गायींच्या सहवासाने कोरोनाला ठेवले दूर* *राज्यातील तीनशे गोशाळेत पाहणीतील निष्कर्ष*

इमेज
 * देशी गायींच्या सहवासाने कोरोनाला ठेवले दूर* *राज्यातील तीनशे गोशाळेत पाहणीतील निष्कर्ष* पुणेः कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, असे ठिकाण सापडणे शक्य नाही. मात्र देशी गायींच्या सहवासात राहिल्याने कोरोनापासून दूर राहू शकतो असा अनुभव आला आहे. पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने केलेल्या पाहणीत आश्चर्यजनक अनुभव आला आहे. कोरोना काळात दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली का, हे जाणून घेण्यासाठी पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने राज्यातील ३०० गोशाळांमध्ये सर्व्हे केला आणि अत्यंत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली समितीच्या कसबा भागाचे संयोजक गिरीष वैकर सांगत होते. ते म्हणाले, एकूण ३०० गोशाळांपैकी २९२ गोशाळांमध्ये काम करणाऱ्या एकालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे ही बहुतेक मंडळी विविध कामानिमित्त बाहेर येणे जाणे करत होती. गोशाळांच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. आठ गोशाळांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या एखाद-दुसऱ्या कामगाराला कोरोना झाल्याचे सांगितले. या ३०० गोशाळांमध्ये दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या एकूण १८९५ व्यक्

MB NEWS-*एक तासांपासूनवाहतुक खोळंबली; परळीच्या उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी बनली ज्वलंत समस्या!*

इमेज
 *एक तासांपासूनवाहतुक खोळंबली; परळीच्या उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी बनली ज्वलंत समस्या!*  ● काल आंदोलन होतं म्हणून चक्काजाम आज आपलं नेहमीचच ट्राफीकजाम● परळी वैजनाथ :प्रतिनिधी....      शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीरेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दुपारी पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. उड्डाणपुलावर तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती. नेहमी दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं गुंतले होते की ? त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले आहेत.नागरीकांना काही वाटले नाही फक्त नेहमीप्रमाणे कुचंबणा सहन करावी लागली इतकेच.निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले.               उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर एका तासापासून उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली.या ट्राफिक जाममुळे वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बराच वेळ दिसत नव्हते. वाहतूकदार चा

MB NEWS-केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात सिरसाळा येथे निदर्शने

इमेज
  केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात सिरसाळा येथे निदर्शने परळी वै : दि.२६   मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,अखिल भारतीय किसान सभा,शेतमजूर युनियन व डी वाय एफ आय युवक संघटनेच्या वतीने सिरसाळा येथे शनिवार दि 26 रोजी देशात सुरू असलेली अघोषित आणीबाणी,शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे व इतर मागण्या करिता देशभरातील विविध राज्यामध्ये राजभवणाला घेराव घालून देशाच्या राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले याच आंदोलनाला पाठिंबा देत सिरसाळा येथे निदर्शने करण्यात आली.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवून उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. देशातील परिस्थिती ही अघोषित आणीबाणी लागू केल्याप्रमाणे असून शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतमालास हमी भाव देण्याचा कायदा करण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कट कारस्थान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या  सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी करून  शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले.सध्या देशसभरात  अघोष

MB NEWS-ही तर सुरवात आहे, आरक्षण परत मिळेपर्यंत लढा चालूच ठेऊ - पंकजाताई मुंडे यांनी ठणकावले* *पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त चक्का जाम आंदोलन ; पिंपरीत पंकजाताई मुंडेंना असंख्य कार्यकर्त्यांसह अटक*

इमेज
 * ही तर सुरवात आहे, आरक्षण परत मिळेपर्यंत लढा चालूच ठेऊ - पंकजाताई मुंडे यांनी ठणकावले* *पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त चक्का जाम आंदोलन ; पिंपरीत पंकजाताई मुंडेंना असंख्य कार्यकर्त्यांसह अटक* *"पंकजाताई आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है", "परत द्या परत द्या आरक्षण परत द्या", घोषणांनी परिसर दणाणला* पुणे । दिनांक २६। ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार आहे, हे आरक्षण जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, ही तर सुरुवात आहे, आरक्षणाचा हा लढा भविष्यात अधिक तीव्र करू अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारला ठणकावले. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कात्रज आणि पिंपरी चौकात भाजपच्या वतीने आज उत्स्फूर्त 'चक्का जाम' आंदोलन करण्यात आले. आंदोलनास सुरवात करण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी शाहू चौकात जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले व त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलतांना र

MB NEWS- *लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे- खा.डाॅ.प्रितम मुंडे* ⬛ *परळीत ओबीसींचे प्रचंड आंदोलन; सारे रस्ते जाम - यापुढे सरकारला फोडणार घाम*

इमेज
 *लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे- खा.डाॅ.प्रितम मुंडे* ⬛   *परळीत ओबीसींचे प्रचंड आंदोलन; सारे रस्ते जाम - यापुढे सरकारला फोडणार घाम*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळीचे प्रचंड आंदोलन ए तो सिर्फ झाॅंकी है, आगे का  आंदोलन बाकी है ' असे म्हणत पंकजाताई पुढची दिशा ठरवुन सांगतील त्याप्रमाणे आंदोलन पुढे जाईल. ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत.सरकारला झोप येऊ देणार नाही. सरकार ओबीसी ला भोळं समजत असेल तर लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे असे म्हणत खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.       ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज (शनिवार दि.२६ जून ) रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.   परळीत खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या  नेतृत्वाखाली  चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील इटके कॉर्नर चौकात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात ओबीसी समाजासह भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.यावेळी बोलताना खा.प्रितम

MB NEWS-आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; निळकंठ चाटे यांचे आवाहन

इमेज
 *पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम* *परळीत खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार तीव्र आंदोलन* आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; निळकंठ चाटे यांचे आवाहन परळी दि.२४ (संजय क्षिरसागर) ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवार दि.२६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार हे चक्काजाम आंदोलन होत असून खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या हया आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा जिलहाधकक्ष निळकंठ चाटे  यांनी केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. हे आंदोलन जिल्हायात विविध ठिकाणी  करण्यात येणार आहे.परळी शहरातील इटके कॉर्नर येथील आंदोलनाचे नेतृत्व  खा.डॉ.प्रितमताई मुंडे या करणार आहेत, सकाळी दहा वाजता आंदोलनाला स

MB NEWS- प्रभू वैजनाथ मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुलं करावें..भोजराज पालीवाल उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली

इमेज
 प्रभू वैजनाथ मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुलं करावें..भोजराज पालीवाल उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली . परळी वै:-             मागील काही दिवसांपासून, कोव्हिडं महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे, बंद करण्यात आले होते. कारण अनेक मंदिरात गर्दि होत असल्याने, महामारी फोफावली जाऊ शकत होती.   त्यामुळे शहरातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक महत्वाचे असलेले प्रभू वैजनाथ मंदिर देखील बंद करण्यात आले होते.     सद्यस्थितीत कोव्हिडं सदृश रुग्ण कमी होत असल्याने, आणि प्रभू वैजनाथ मंदिर महत्त्व लक्षात घेतले तर,सर्वांचे वैद्य असं होतो.      आणि अशा पवित्र असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिर जर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुलं केले तर,सर्वसामान्य जनतेला दर्शनाचा आनंद घेता येईल. त्याच बरोबर सामाजिक अंतर ठेवून, विशिष्ट नियमावली नूसार वरील मंदिर दर्शनासाठी खुलं करावं,,उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन अशी मागणी,शिव सेनेचे माजी शहर प्रमुख भोजराज पालिवाल,शिव सेनेचे जेष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख महेश पप्पू केंद्रे, शिवसेना माजी उपशहर प्रमुख सचिन स्

MB NEWS-परळीच्या एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघाले, राजपत्र प्रसिद्ध झाले*

इमेज
 * परळीच्या एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघाले, राजपत्र प्रसिद्ध झाले*  * सिरसाळा येथील 35 हेक्टर जमीन औद्यीगिक क्षेत्र म्हणून घोषित* *धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळीची विकासाकडे वाटचाल* मुंबई (दि. 25) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुक्यातील सिरसाळा येथील एमआयडीसी उभारणीच्या कामास वेग आला असून, सिरसाळा येथील गट क्र. 343 मधील 35 हेक्टर जमीन उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने याबाबतचे नोटीफिकेशन निघाले आहे,  याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून शासनाचे अवर सचिव किरण जाधव यांनी ते प्रसिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वीच सिरसाळा येथे एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने अधिकृत मान्यता प्रदान केली होती. याबाबतची माहिती उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी स्वतः ट्विट करून देखील दिली होती. सिरसाळा येथे पंचतारांकित एमआयडीसी उभारणे हे आपले स्वप्न असून, हे साकारण्याचा दृष्टीने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  सन 2017 पासून धनंज

MB NEWS-चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा-फुलचंद कराड

इमेज
  चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा-फुलचंद कराड   परळी (प्रतिनिधी):- राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. या न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसी समाजात प्रचंड असंतोष आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, पदोन्नतीचे आरक्षण कायम ठेवावे यासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव तथा ओबीसी नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी 26 जुन रोजी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड  यांनी केले आहे.           राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल विरोधात गेला अशी ओबीसी समाजाची भावना आहे.       या अनुषंगाने पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येणार आहे.             पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी मो

MB NEWS-*परळीत ओबीसी आरक्षणासाठी खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार चक्काजाम*

इमेज
* परळीत ओबीसी आरक्षणासाठी खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार चक्काजाम*  परळी । दि.२४ । ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवार दि.२६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार  परळी भाजप आंदोलन करणार आहे,खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे आणि शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.परळी शहरात होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व  खा.डॉ.प्रितमताई मुंडे या करणार आहेत,शहरातील इटके कॉर्नर चौकात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून परळी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ओबीसी संघटना आणि समाज बांधव सहभागी होणार असल्याचे श्री.मुंडे आणि लोहिय

MB NEWS-दु:खद वार्ता:किर्तीकुमार नरवणे गुरुजी यांचे निधन ⬛ परळीतील जुना परखड नेता, अभ्यासु शिक्षक, स्पष्टवक्ता व उद्यमशील मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरवले

इमेज
  दु:खद वार्ता:किर्तीकुमार नरवणे गुरुजी यांचे निधन ⬛ परळीतील जुना परखड नेता, अभ्यासु शिक्षक, स्पष्टवक्ते व उद्यमशील मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरवले  परळी वैजनाथ,येथील श्री.संत गुरूलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडीचे विश्वस्त,लिंगायत समाजाचे प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उद्योजक श्री.किर्तीकुमार नरवणे गुरूजींचे गुरुवारी दुपारी  निधन झाले. मृत्यू समयी ते ७६ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्यात  पत्नी, एक मुलगा, सूना,नातू, भाऊ असा परिवार आहे.          किर्तीकुमार नरवणे हे परळी तालुक्यातील सर्व परिचित व्यक्तीमत्व होते.जुन्या पिढीतील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.परळीतील राजकीय आंदोलने, सामाजिक चळवळी आदींमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा.विविध पदांवर त्यांनी काम केले.एक परखड वक्ता अशी त्यांची ओळख होती. तरुणांनी उद्योगशील असावे यासाठी ते सतत मार्गदर्शन करीत असत. स्वतः आदर्श आचरण व कायम उद्यमशील राहुन नव्या पिढीला त्यांच्याकडे पाहून व चर्चा करुन प्रेरणा मिळेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने परळीतील जुना परखड नेता, अभ्यासु शिक्षक, स्पष्टवक्ता व उद

MB NEWS-परळीतील शास्त्रीनगरमधिल 'वटपौर्णिमेचा' आदर्श: गेल्या वर्षी केली लागवड - यावर्षी वटपौर्णिमेला पुजला तोच वड

इमेज
  परळीतील शास्त्रीनगरमधिल 'वटपौर्णिमेचा' आदर्श: गेल्या वर्षी केली लागवड - यावर्षी वटपौर्णिमेला पुजला तोच वड परळी वैजनाथ , रविंद्र जोशी....       गेल्या दोन वर्षांपासून सर्वच सणावरही कोरोना महामारीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर परळीत गेल्या वर्षी कडक लाॅकडाऊनमुळे महिलांना वटपौर्णिमा सार्वजनिक स्वरुपात करता आली नव्हती.परळीतील शास्त्रीनगरमधिल महिलांनी गेल्या वर्षी एका वटवृक्षाची लागवड केली.यंदा ते झाड मोठे झाले असुन याच वडाची पुजा करुन महिलांनी वटपौर्णिमा सणाचा आनंद व वृक्षारोपणाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला.पर्यावरणपुरक वटपौर्णिमा साजरी करुन या महिलांनी वटपौर्णिमेचा आदर्श निर्माण केला आहे.      परळीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वटसावित्री पौर्णिमेचा सण गुरुवारी (दि.२४) महिलांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करुन परिसरात असलेल्या वटवृक्षाच्या झाडाची पूजा करुन उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. महिलावर्गात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा मात्र या सणावर इतर

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात होणार 'चक्का जाम' आंदोलन* *खासदार, आमदारांसह कार्यकर्ते होणार मोठया संख्येने सहभागी*

इमेज
 * पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात होणार 'चक्का जाम' आंदोलन*  *खासदार, आमदारांसह कार्यकर्ते होणार मोठया संख्येने सहभागी*  पुणे । दिनांक २४। महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. खासदार, आमदारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.    २६ जून रोजी पुणे शहरातील शाहू कॉलेज येथे छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन कात्रज चौकात सर्व कार्यकर्ते सकाळी 10 वाजता एकत्र येऊन याठिकाणी 'चक्का जाम' करणार आहेत तर पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चौकात सकाळी 11.30 वा. चक्का जाम होणार आहे. पुण्यात खा. गिरीश बापट, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. मुक्ता टिळक, आ. भीमराव तापकीर, आ.सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ तर पिंपरी चौकात आ.

MB NEWS-राज्यात २६ जूनला एक हजार ठिकाणी 'चक्का जाम' आंदोलन* *ओबीसींच्या रक्षणार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार* *पंकजाताई मुंडे यांची मुंबईत पत्रकार परिषद*

इमेज
 * राज्यात २६ जूनला एक हजार ठिकाणी 'चक्का जाम' आंदोलन* *ओबीसींच्या रक्षणार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार* *पंकजाताई मुंडे यांची मुंबईत पत्रकार परिषद*  मुंबई । दिनांक २५। ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे २६ जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गुरुवारी दिली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रसंगी उपस्थित होते. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली.      पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार

MB NEWS-ओबीसी आरक्षणासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -राजेश गिते

इमेज
  ओबीसी आरक्षणासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -राजेश गिते परळी (प्रतिनिधी) -    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.या निकालामुळे ओबीसी समाजात प्रचंड असंतोष आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले त्या मुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल विरोधात गेला अशी ओबीसी समाजाची भावना आहे .  ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव तथा ओबीसी नेत्या मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचे जाहिर केले आहे. या अनुषंगाने मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी २६जुन रोजी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येणार आहे मा. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा नेते राजेश गिते यांनी क

MB NEWS-ओबीसी समाजाचा अंत पाहू नका―प्रा.टी. पी.मुंडे* *ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर!*

इमेज
 * ओबीसी समाजाचा अंत पाहू नका―प्रा.टी. पी.मुंडे* *ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर!* *पारंपारिक वाद्यांसह ओबीसी समाजाच्या बांधवांनी दाखवली एकतेची वज्रमूठ महिलांचाही लाक्षणिक सहभाग!* परळी वैजनाथ प्रतिनिधी संपूर्ण राज्यात ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण महा विकास आघाडीच्या सरकारच्या वेळकाढूपणा मुळे व नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने रद्द केले त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे ओबीसी सह अलुतेदार बलुतेदार व इतर ओबीसीत समाविष्ट असणाऱ्या समाजाचा अंत महा विकास आघाडी सरकारने पाहु नये असा इशारा ओबीसी नेते प्रा.टी.पी. मुंडे( सर) यांनी दिला महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चा च्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य निदर्शनात ते बोलत होते . सदरील मागण्यांचे निवेदन ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना सादर  करण्यात आले. ओबीसी समाजाच्या न्यायिक व संविधानिक मागण्यांच्या  निषेधार्थ आज परळी वैजनाथ येथे दि 24 गुरुवार रोजी  ओबीसी जनमोर्चा चे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे कोषाध्यक्ष चंद्रकांत बावकर  उपाध्यक्ष प्रा. ट

MB NEWS- *अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान - धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय*

इमेज
 *अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान - धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय* *11 वी व 12 वी मध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख रुपये, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ* मुंबई (दि. 24) ---- : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही

MB NEWS-परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत वाढ मुदतवाढ - धनंजय मुंडे*

इमेज
 * परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत वाढ मुदतवाढ - धनंजय मुंडे* मुंबई (दि. 23) ---- : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ना. मुंडेंकडे मुदत वाढ देण्याबाबत विनंती केली होती.  त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जून पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  परदेश शिष्यवृत्ती साठी इच्छुक विद्यार्थ

MB NEWS-उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय:- मंत्री धनंजय मुंडे*

इमेज
 *उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय:- मंत्री धनंजय मुंडे*   *मंत्रालयात  होलार समाजाच्या प्रतिनिधींसमवेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत  बैठक.*          मुंबई,दि.23 : होलार समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिली.    मंत्रालय येथे राज्यातील होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली.या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे,बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योति गजभिये,आयुक्त डॉ.प्रशांत नारनरवरे,समाजकल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, मानिकराव भंडगे यासह सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.             श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग

MB NEWS-आशा स्वयंसेविकांचा संप मिटला मानधनवाढ आणि कोविड भत्ता देण्याचा निर्णय

इमेज
  आशा स्वयंसेविकांचा संप मिटला  मानधनवाढ आणि कोविड भत्ता देण्याचा निर्णय मुंबई l आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी पुन्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशा स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधनवाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक मंगळवारी बोलावली होती. मात्र; चर्चेवेळी कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, आज बुधवारच्या बैठकीत तोड़गा निघाला. बुधवारी संपाचा ९ वा दिवस होता. १५ जूनपासून महाराष्ट्रात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे संपावर गेले होते. मानधन नको, वेतन द्या, या मूळ व प्रमुख मागणीसह कोरोना काळात प्रतिदिन ५०० रुपये भत्ता देण्याबरोबरच आशा स्वयंसेविका (वर्कर) यांचा शासनाने विमा काढण्याबरोबरच आर

MB NEWS-गडर्देवाडी येथील ग्रामपंचायतने गावात संपूर्ण दारु बंदीचा आदर्श निर्णय यापुढे गावात दारु विक्री करु नये-युवा सरपंच सुशांतसिंह पवार

इमेज
  गर्देवाडी येथील ग्रामपंचायतने गावात संपूर्ण दारु बंदीचा आदर्श निर्णय   यापुढे गावात दारु विक्री करु नये-युवा सरपंच सुशांतसिंह पवार परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)       तालुक्यातील गडर्देवाडी येथील ग्रामपंचायतने गावात संपूर्ण दारु बंदीचा आदर्श निर्णय घेतला असून इथून पुढे गावात दारु विक्री करण्यावर बंधन घालण्यात आले असल्याचे युवा सरपंच सुशांतसिंह पवार यांनी सांगितले.                  तालुक्यातील गर्देवाडी येथील नवनिर्वाचित युवा सरपंच परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर मागच्या वर्षी गावात येवून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. या निवडणुकीत स्वतः पँनल तयार केला. व बहूमताने निवडून आणला व सरपंच झाले.सरपंच झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. यावेळी सरपंच म्हणून गावात विविध उपाययोजना करुन संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आदर्श गाव करण्यासाठी सर्वात पहिला निर्णय घेऊन ग्रामपंचायत मध्ये ठराव पास केला. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गावात दवंडी पिटवून यासंदर्भात जनजागृती केली. व स्वयंसेवक नेमून गावात अवैधरित्या कोणीही चोरी छुप्या पध्दतीने दारु विक्री करु नये

MB NEWS-राज्य सरकारने निवडणुका रद्द कराव्या - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं धक्कादायक*

इमेज
 * राज्य सरकारने निवडणुका रद्द कराव्या - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं धक्कादायक*  मुंबई । दिनांक २३। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा निर्णय ओबीसींसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे राज्य सरकारने हया निवडणुका रद्द कराव्या अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वृत्त वाहिन्यांशी बोलतांना केली. राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, यावर पंकजाताई मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या निर्णयाने ओबीसींवर घोर अन्याय केला आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं हे धक्कादायक आहे, असे त्या म्हणाल्या. इम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडे बोट दाखवणं चुकीच आहे, त्यासाठी टास्क फोर्स नेमून सरकारने आपल्या यंत्रणेमार्फत डेटा मागवावा तथापि, डेटाच्या आधारे निर्णय राहिला असं म्हणणं अमान्य आहे. राज्य सरकारकडून ओबीसींची दिशाभूल केली जातेयं असे सांगून हया निवडणुका तातडीने रद्द कराव्या, यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ••••

MB NEWS-पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल तुकाराम बोडके यांचा सत्कार

इमेज
  पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती  झाल्याबद्दल तुकाराम बोडके यांचा सत्कार परळी, वैजनाथ, प्रतिनिधी....       येथील परळी  ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके यांची गेवराई येथे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती  झाल्याबद्दल त्यांचा येथे मंगळवारी सत्कार करण्यात आला .यावेळी  वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी ,भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा ,श्याम बुद्रे,संजय खाकरे उपस्थित होते. तुकाराम बोडके हे परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक, पोलीस जमादार या पदावर कार्यरत होते त्यानंतर त्यांची येथून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आता गेवराई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. मंगळवारी तुकाराम बोडके यांचा सत्कार करण्यात आला

MB NEWS-२६ जूनचा 'चक्का जाम' आंदोलन ताकदीनिशी यशस्वी करा* *पंकजाताई मुंडे यांचे बीड भाजपच्या ऑनलाईन बैठकीत आवाहन ; नियोजनाचाही घेतला आढावा*

इमेज
 * २६ जूनचा 'चक्का जाम' आंदोलन ताकदीनिशी यशस्वी करा* *पंकजाताई मुंडे यांचे बीड भाजपच्या ऑनलाईन बैठकीत आवाहन ; नियोजनाचाही घेतला आढावा*  बीड । दिनांक २२ । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या २६ जून रोजी भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.  'चक्का जाम' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमसेन धोंडे, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, ओबीसी मोर्चाचे डाॅ. लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते. ओबीसींचे राजकी