युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात होणार 'चक्का जाम' आंदोलन* *खासदार, आमदारांसह कार्यकर्ते होणार मोठया संख्येने सहभागी*

 *पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात होणार 'चक्का जाम' आंदोलन* 



*खासदार, आमदारांसह कार्यकर्ते होणार मोठया संख्येने सहभागी* 


पुणे । दिनांक २४।

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २६ जून रोजी राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. खासदार, आमदारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. 


  २६ जून रोजी पुणे शहरातील शाहू कॉलेज येथे छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन कात्रज चौकात सर्व कार्यकर्ते सकाळी 10 वाजता एकत्र येऊन याठिकाणी 'चक्का जाम' करणार आहेत तर पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चौकात सकाळी 11.30 वा. चक्का जाम होणार आहे. पुण्यात खा. गिरीश बापट, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. मुक्ता टिळक, आ. भीमराव तापकीर, आ.सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ तर पिंपरी चौकात आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, महापौर मायताई ढोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सदाशिव खाडे, ॲड मोरेश्वर शेडगे यासह असंख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या