युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-*परळीत ओबीसी आरक्षणासाठी खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार चक्काजाम*


*परळीत ओबीसी आरक्षणासाठी खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार चक्काजाम* 



परळी । दि.२४ ।

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवार दि.२६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार  परळी भाजप आंदोलन करणार आहे,खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे आणि शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.


राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.परळी शहरात होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व  खा.डॉ.प्रितमताई मुंडे या करणार आहेत,शहरातील इटके कॉर्नर चौकात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून परळी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ओबीसी संघटना आणि समाज बांधव सहभागी होणार असल्याचे श्री.मुंडे आणि लोहिया यांनी सांगितले.


•••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या