MB NEWS-आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; निळकंठ चाटे यांचे आवाहन

 *पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम*


*परळीत खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार तीव्र आंदोलन*



आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; निळकंठ चाटे यांचे आवाहन


परळी दि.२४ (संजय क्षिरसागर)

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवार दि.२६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार हे चक्काजाम आंदोलन होत असून खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या हया आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा जिलहाधकक्ष निळकंठ चाटे  यांनी केले आहे.


राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. हे आंदोलन जिल्हायात विविध ठिकाणी  करण्यात येणार आहे.परळी शहरातील इटके कॉर्नर येथील आंदोलनाचे नेतृत्व  खा.डॉ.प्रितमताई मुंडे या करणार आहेत, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून आंदोलनात भाजयुमो चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ओबीसी संघटना आणि समाज बांधव सहभागी होणार असल्याचेही श्री चाटे यांनी सांगितले.


•••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !