युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीच्या एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघाले, राजपत्र प्रसिद्ध झाले*

 *परळीच्या एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघाले, राजपत्र प्रसिद्ध झाले*




 *सिरसाळा येथील 35 हेक्टर जमीन औद्यीगिक क्षेत्र म्हणून घोषित*


*धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळीची विकासाकडे वाटचाल*


मुंबई (दि. 25) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुक्यातील सिरसाळा येथील एमआयडीसी उभारणीच्या कामास वेग आला असून, सिरसाळा येथील गट क्र. 343 मधील 35 हेक्टर जमीन उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने याबाबतचे नोटीफिकेशन निघाले आहे,  याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून शासनाचे अवर सचिव किरण जाधव यांनी ते प्रसिद्ध केले आहे.


काही दिवसांपूर्वीच सिरसाळा येथे एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने अधिकृत मान्यता प्रदान केली होती. याबाबतची माहिती उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी स्वतः ट्विट करून देखील दिली होती.


सिरसाळा येथे पंचतारांकित एमआयडीसी उभारणे हे आपले स्वप्न असून, हे साकारण्याचा दृष्टीने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  सन 2017 पासून धनंजय मुंडे यासाठी प्रयत्न करीत असून राज्यात सत्ताबदल होताच डिसेंबर 2019 चे अधिवेशनात त्यांनी या बाबतची पहिली बैठक घेऊन कारवाई सुरू केली आणि अवघ्या वर्षभरात याबाबतचे नोटीफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. 


 धनंजय मुंडे यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी उभारून बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते.


उद्योग विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या राजपत्रामध्ये गट क्र. 343 मधील 35 हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली असून, परळी सिरसाळा रस्त्यालगतच्या या जमिनीवर औद्योगीकीकरण झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व गुंतवणूक होणार आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या