MB NEWS-केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात सिरसाळा येथे निदर्शने

 केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात सिरसाळा येथे निदर्शने



परळी वै : दि.२६ 


 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,अखिल भारतीय किसान सभा,शेतमजूर युनियन व डी वाय एफ आय युवक संघटनेच्या वतीने सिरसाळा येथे शनिवार दि 26 रोजी देशात सुरू असलेली अघोषित आणीबाणी,शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे व इतर मागण्या करिता देशभरातील विविध राज्यामध्ये राजभवणाला घेराव घालून देशाच्या राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले याच आंदोलनाला पाठिंबा देत सिरसाळा येथे निदर्शने करण्यात आली.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवून उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.


देशातील परिस्थिती ही अघोषित आणीबाणी लागू केल्याप्रमाणे असून शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतमालास हमी भाव देण्याचा कायदा करण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे.


देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कट कारस्थान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या  सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी करून  शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले.सध्या देशसभरात  अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.देशात करण्यात येत असलेले शेतकरी आंदोलन विविध मार्गाने दडपून टाकण्याचे काम सुरू आहे.

हे सर्व कटकारस्थान थांबवून शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतमालास हमी भाव देणारा कायदा मंजूर करण्यात यावा ही मागणी घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,अखिल भारतीय किसान सभा,शेतमजूर युनियन व डी वाय एफ आय संघटनेच्यावतीने देशभरात विविध राज्यामध्ये राजभवणाला घेराव घालून आपल्या मागण्याचे निवेदन राज्यपाल महोदय मार्फत देशाच्या राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे.याच आंदोलनाचा भाग म्हणून सिरसाळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.या वेळी जिल्हा किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे,माकपचे तालुका सचिव कॉ.गंगाधर पोटभर,मोहा पंचायत समिती गणाचे सदस्य कॉ.सुदाम शिंदे कॉ.भगवान बडे,कॉ.अनुरथ गायकवाड, कॉ.मदन वाघमारे, कॉ.सखाराम शिंदे,कॉ.विशाल देशमुख, कॉ.पप्पू देशमुख,बाबा शेरकर,प्रकाश उजगरे,शरद सलगर,अण्णासाहेब खडके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार