MB NEWS-ही तर सुरवात आहे, आरक्षण परत मिळेपर्यंत लढा चालूच ठेऊ - पंकजाताई मुंडे यांनी ठणकावले* *पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त चक्का जाम आंदोलन ; पिंपरीत पंकजाताई मुंडेंना असंख्य कार्यकर्त्यांसह अटक*

 *ही तर सुरवात आहे, आरक्षण परत मिळेपर्यंत लढा चालूच ठेऊ - पंकजाताई मुंडे यांनी ठणकावले*



*पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये उत्स्फूर्त चक्का जाम आंदोलन ; पिंपरीत पंकजाताई मुंडेंना असंख्य कार्यकर्त्यांसह अटक*


*"पंकजाताई आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है", "परत द्या परत द्या आरक्षण परत द्या", घोषणांनी परिसर दणाणला*



पुणे । दिनांक २६।

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार आहे, हे आरक्षण जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, ही तर सुरुवात आहे, आरक्षणाचा हा लढा भविष्यात अधिक तीव्र करू अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारला ठणकावले.




महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कात्रज आणि पिंपरी चौकात भाजपच्या वतीने आज उत्स्फूर्त 'चक्का जाम' आंदोलन करण्यात आले. आंदोलनास सुरवात करण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी शाहू चौकात जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले व त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलतांना राज्य सरकारवर घणाघात केला.


आपले सरकार असतांना आपण ओबीसींच्या राजकीय आरक्षणात न्यायाची भूमिका घेतली होती. पण नंतर आलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण रद्द झाले. ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारचे आहे त्यांनी ते करावं. सरकारने मन मोठं केलं पाहिजे.सरकारमधील मंत्र्यांना आंदोलनाची भाषा शोभत नाही, त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा हा प्रश्न सोडवावा असे त्या म्हणाल्या. 


शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा, आरक्षणाचा पाया रचला. सामान्य माणसाला सत्तेत आणण्यासाठी लोकनेते मुंडे साहेब राजकारणात आले. वंचित, पिडिताचा वाली आणि वाणी बनण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, त्यांचे हेच स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे असे त्या म्हणाल्या.

काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही. आतापर्यंत अनेक निवडणुका सरकारने जशा पुढे ढकलल्या तशा हया देखील ढकलाव्या. यह चक्का जाम झांकी है, असली आंदोलन बाकी है, असे सांगत भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पंकजाताईंनी दिला.


मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न वेगवेगळा आहे, यात विनाकारण राजकारण आणून दोन समाजात भिंत उभा करण्याचे महापाप करू नका असे आवाहनही त्यांनी केले. ही लढाई सर्वानी मिळून जिंकायची आहे असेही त्या म्हणाल्या.


पुण्यात खा. गिरीश बापट, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. मुक्ता टिळक, आ. भीमराव तापकीर, आ.सुनील कांबळे, मेधा कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, योगेश पिंगळे, दत्ता खाडे तर पिंपरी चौकात आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, महापौर मायताई ढोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सदाशिव खाडे, ॲड मोरेश्वर शेडगे यासह असंख्य कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


*पंकजाताईंना असंख्य कार्यकर्त्यांसह अटक*

---‐-------------------------

पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चौकात चक्का जाम आंदोलन करणाऱ्या पंकजाताई मुंडे यांचेसह आ. महेश लांडगे, आ. माधुरी मिसाळ, तसेच महापौर व असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. "पंकजाताई आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, 'अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे', 'ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान मे', 'परत द्या परत द्या आरक्षण परत द्या' अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार