MB NEWS-गडर्देवाडी येथील ग्रामपंचायतने गावात संपूर्ण दारु बंदीचा आदर्श निर्णय यापुढे गावात दारु विक्री करु नये-युवा सरपंच सुशांतसिंह पवार

 गर्देवाडी येथील ग्रामपंचायतने गावात संपूर्ण दारु बंदीचा आदर्श निर्णय

 


यापुढे गावात दारु विक्री करु नये-युवा सरपंच सुशांतसिंह पवार

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)

      तालुक्यातील गडर्देवाडी येथील ग्रामपंचायतने गावात संपूर्ण दारु बंदीचा आदर्श निर्णय घेतला असून इथून पुढे गावात दारु विक्री करण्यावर बंधन घालण्यात आले असल्याचे युवा सरपंच सुशांतसिंह पवार यांनी सांगितले.

                 तालुक्यातील गर्देवाडी येथील नवनिर्वाचित युवा सरपंच परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर मागच्या वर्षी गावात येवून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. या निवडणुकीत स्वतः पँनल तयार केला. व बहूमताने निवडून आणला व सरपंच झाले.सरपंच झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. यावेळी सरपंच म्हणून गावात विविध उपाययोजना करुन संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आदर्श गाव करण्यासाठी सर्वात पहिला निर्णय घेऊन ग्रामपंचायत मध्ये ठराव पास केला. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गावात दवंडी पिटवून यासंदर्भात जनजागृती केली. व स्वयंसेवक नेमून गावात अवैधरित्या कोणीही चोरी छुप्या पध्दतीने दारु विक्री करु नये यासाठी प्रयत्न करत आहेत. जर अवैधरित्या कोणी असे करत असेल तर कारवाई करून पोलीसांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सरपंच सुशांतसिंह पवार यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार