MB NEWS- *लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे- खा.डाॅ.प्रितम मुंडे* ⬛ *परळीत ओबीसींचे प्रचंड आंदोलन; सारे रस्ते जाम - यापुढे सरकारला फोडणार घाम*

 *लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे- खा.डाॅ.प्रितम मुंडे*



⬛   *परळीत ओबीसींचे प्रचंड आंदोलन; सारे रस्ते जाम - यापुढे सरकारला फोडणार घाम* 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      परळीचे प्रचंड आंदोलन ए तो सिर्फ झाॅंकी है, आगे का  आंदोलन बाकी है ' असे म्हणत पंकजाताई पुढची दिशा ठरवुन सांगतील त्याप्रमाणे आंदोलन पुढे जाईल. ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत.सरकारला झोप येऊ देणार नाही. सरकार ओबीसी ला भोळं समजत असेल तर लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे असे म्हणत खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.



      ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज (शनिवार दि.२६ जून ) रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.   परळीत खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या  नेतृत्वाखाली  चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील इटके कॉर्नर चौकात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात ओबीसी समाजासह भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.यावेळी बोलताना खा.प्रितम मुंडे यांनी सरकारला इशारा दिला.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. यापुढचे आंदोलन यापेक्षाही तीव्र असेल असे त्यांनी  सांगितले.



      या आंदोलनात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.परळीत ओबीसींचे प्रचंड आंदोलन झाले. सारे रस्ते जाम झाले होते. यावेळी खा.डाॅ.प्रितम मुंडे सह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !