मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय:- मंत्री धनंजय मुंडे*

 *उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय:- मंत्री धनंजय मुंडे* 


 *मंत्रालयात  होलार समाजाच्या प्रतिनिधींसमवेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत  बैठक.* 

        मुंबई,दि.23 : होलार समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिली.



   मंत्रालय येथे राज्यातील होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली.या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे,बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योति गजभिये,आयुक्त डॉ.प्रशांत नारनरवरे,समाजकल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, मानिकराव भंडगे यासह सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.होलार समाजासंदर्भात बार्टीने नव्याने या जातींचा अभ्यास करावा.जातीच्या नोंदी जेंव्हा नव्याने केल्या जातील तेंव्हा त्या अगदी काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा. या समाजाने महामानवाच्या यादीसाठी जी नावे सुचविली आहेत ती शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्यांचा यामध्ये समावेश करण्यात यावा,स्टँड अप योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या समाजातील जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी नव्याने धोरण करत असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले.


            श्री.मुंडे म्हणाले,दादासाहेब सबलीकरण योजना राबविताना ज्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यांना समन्यायी वाटप करावे याबाबत सामाजिक न्याय विभागाने सर्व जिल्हाधिकारी व समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त यांना पत्राव्दारे कळवावे.सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमध्ये सर्वांना समन्याय देण्यात यावा अशा सक्त सूचना बैठकीत श्री.मुंडे यांनी केल्या.


           यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे यांनी होलार समाजासंदर्भात सद:स्थितीत सुरू असलेली कार्यवाहीची सविस्तर माहिती बैठकीत दिली.


            होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, यांनी यावेळी होलार समाजाच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी अनेक सुचना मांडल्या, या समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग नेमावा,अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ,ब,क,ड वर्गवारी करून होलार समाजाला ठराविक आरक्षण मिळावे,होलार समाजाची स्थानिक चौकशी करून त्या आधारावर जात पडताळणी मिळावी, होलार समाजाती वाजंत्री कलाकांरासाठी अनुदानाची शिफारस, मागासवर्गीय विद्यार्थ्यी वसतीगृहात होलार समाजातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा,होलार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे,राज्यस्तरावरील समितीमध्ये या समाजाचा प्रतिनिधी नेमणे, या समाजात उद्योजक तयार व्हावेत यासाठी शासनाकडून नव्याने योजना देण्यात याव्यात अशा विविध सुचना या बैठकीत होलार समाजाच्या प्रतिनिधींनी मांडल्या. ******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....