युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- प्रभू वैजनाथ मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुलं करावें..भोजराज पालीवाल उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली

 प्रभू वैजनाथ मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुलं करावें..भोजराज पालीवाल

उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.



परळी वै:-

            मागील काही दिवसांपासून, कोव्हिडं महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे, बंद करण्यात आले होते. कारण अनेक मंदिरात गर्दि होत असल्याने, महामारी फोफावली जाऊ शकत होती.

  त्यामुळे शहरातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक महत्वाचे असलेले प्रभू वैजनाथ मंदिर देखील बंद करण्यात आले होते.

    सद्यस्थितीत कोव्हिडं सदृश रुग्ण कमी होत असल्याने, आणि प्रभू वैजनाथ मंदिर महत्त्व लक्षात घेतले तर,सर्वांचे वैद्य असं होतो.

     आणि अशा पवित्र असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिर जर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुलं केले तर,सर्वसामान्य जनतेला दर्शनाचा आनंद घेता येईल. त्याच बरोबर सामाजिक अंतर ठेवून, विशिष्ट नियमावली नूसार वरील मंदिर दर्शनासाठी खुलं करावं,,उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन अशी मागणी,शिव सेनेचे माजी शहर प्रमुख भोजराज पालिवाल,शिव सेनेचे जेष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख महेश पप्पू केंद्रे, शिवसेना माजी उपशहर प्रमुख सचिन स्वामी,शिव सेना शहर संघटक संजय कुकडे,शिवसेना शिवाजी नगर  विभाग प्रमुख प्रकाश साळुंखे, गणेशपार विभाग प्रमुख संजय गावडे,बालासाहेब देशमुख,युवा सेना माजी शहर प्रमुख सचिन लोढा,विशाल सुगरे,महावीर कटके,बाबुलाल पिंपळे,शिवाजी दराडे आदी सह असंख्य शिव सैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या