MB NEWS-परळीतील शास्त्रीनगरमधिल 'वटपौर्णिमेचा' आदर्श: गेल्या वर्षी केली लागवड - यावर्षी वटपौर्णिमेला पुजला तोच वड

 परळीतील शास्त्रीनगरमधिल 'वटपौर्णिमेचा' आदर्श: गेल्या वर्षी केली लागवड - यावर्षी वटपौर्णिमेला पुजला तोच वड





परळी वैजनाथ , रविंद्र जोशी....

      गेल्या दोन वर्षांपासून सर्वच सणावरही कोरोना महामारीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर परळीत गेल्या वर्षी कडक लाॅकडाऊनमुळे महिलांना वटपौर्णिमा सार्वजनिक स्वरुपात करता आली नव्हती.परळीतील शास्त्रीनगरमधिल महिलांनी गेल्या वर्षी एका वटवृक्षाची लागवड केली.यंदा ते झाड मोठे झाले असुन याच वडाची पुजा करुन महिलांनी वटपौर्णिमा सणाचा आनंद व वृक्षारोपणाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला.पर्यावरणपुरक वटपौर्णिमा साजरी करुन या महिलांनी वटपौर्णिमेचा आदर्श निर्माण केला आहे.

     परळीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वटसावित्री पौर्णिमेचा सण गुरुवारी (दि.२४) महिलांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करुन परिसरात असलेल्या वटवृक्षाच्या झाडाची पूजा करुन उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. महिलावर्गात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा मात्र या सणावर इतर सणांप्रमाणे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जोपासल्याचे चित्र परळीत पाहावयास मिळाले. 

      गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण आहेत. गावात, शहरात कोणत्याही सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ नयेत म्हणून सर्व स्तरांवर बंधनं घालण्यात आली. गेल्या वर्षी वटपौर्णिमेला वडाच्या पुजेच्या निमित्ताने महिला एकत्र येतील व शारीरिक अंतर राहणार नाही यामुळे सार्वजनिक सण साजरा करण्यावर बंधनं होती. या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी शहरातील  गल्लोगल्लीतील महिलांनी आपापल्या घराच्या परिसरात  वटवृक्ष लावले होते. त्याची वर्षेभरापासून देखभाल, जोपासना केली आहे. शास्त्रीनगर मधील महिलांनीही गेल्या वर्षी लाँकडाऊनमध्ये वटवृक्षाच्या रोपाची लागवड केली होती. त्या वटवृक्षाची वर्षेभरापासून जोपासना केली. यंदा तो वृक्ष मोठा झाला आहे.त्यामुळे इतरत्र वड पुजायला न जाता यासर्व महिलांनी त्याच वटवृक्षाच्या झाडाची परंपरेप्रमाणे पुजा केली. तसेच  गल्लीत यावर्षीही  वृक्षारोपण केले आहे. पर्यावरणपुरक वटपौर्णिमा साजरी करुन या महिलांनी वटपौर्णिमेचा आदर्श निर्माण केला आहे.

  कोरोनाचे संकट नाहिसे होण्यासाठी महिलांची प्रार्थना.....

           निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वटपौर्णिमेला वड वृक्षांची पूजा करण्यात येते. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया ` माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.गेल्या दोन वर्षांपासून या सणावरही कोरोना महामारीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर परळीत वटवृक्षाची पुजा करताना माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, या प्रार्थनेबरोबरच कोरोनाचे संकट नाहिसे होण्यासाठी महिलावर्गाकडून प्रार्थना करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !