MB NEWS-*एक तासांपासूनवाहतुक खोळंबली; परळीच्या उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी बनली ज्वलंत समस्या!*

 *एक तासांपासूनवाहतुक खोळंबली; परळीच्या उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी बनली ज्वलंत समस्या!* 




● काल आंदोलन होतं म्हणून चक्काजाम आज आपलं नेहमीचच ट्राफीकजाम●


परळी वैजनाथ :प्रतिनिधी....

     शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीरेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दुपारी पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. उड्डाणपुलावर तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती. नेहमी दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं गुंतले होते की ? त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले आहेत.नागरीकांना काही वाटले नाही फक्त नेहमीप्रमाणे कुचंबणा सहन करावी लागली इतकेच.निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले.   





           उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर एका तासापासून उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली.या ट्राफिक जाममुळे वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बराच वेळ दिसत नव्हते. वाहतूकदार चांगलेच खोळंबलेले होते. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते. उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांना, रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !