MB NEWS-दु:खद वार्ता:किर्तीकुमार नरवणे गुरुजी यांचे निधन ⬛ परळीतील जुना परखड नेता, अभ्यासु शिक्षक, स्पष्टवक्ता व उद्यमशील मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरवले

 दु:खद वार्ता:किर्तीकुमार नरवणे गुरुजी यांचे निधन



⬛ परळीतील जुना परखड नेता, अभ्यासु शिक्षक, स्पष्टवक्ते व उद्यमशील मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरवले 


परळी वैजनाथ,येथील श्री.संत गुरूलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडीचे विश्वस्त,लिंगायत समाजाचे प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उद्योजक श्री.किर्तीकुमार नरवणे गुरूजींचे गुरुवारी दुपारी  निधन झाले. मृत्यू समयी ते ७६ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्यात  पत्नी, एक मुलगा, सूना,नातू, भाऊ असा परिवार आहे.

         किर्तीकुमार नरवणे हे परळी तालुक्यातील सर्व परिचित व्यक्तीमत्व होते.जुन्या पिढीतील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.परळीतील राजकीय आंदोलने, सामाजिक चळवळी आदींमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा.विविध पदांवर त्यांनी काम केले.एक परखड वक्ता अशी त्यांची ओळख होती. तरुणांनी उद्योगशील असावे यासाठी ते सतत मार्गदर्शन करीत असत. स्वतः आदर्श आचरण व कायम उद्यमशील राहुन नव्या पिढीला त्यांच्याकडे पाहून व चर्चा करुन प्रेरणा मिळेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने परळीतील जुना परखड नेता, अभ्यासु शिक्षक, स्पष्टवक्ता व उद्यमशील मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरवले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने नरवणे कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार