युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-ओबीसी आरक्षणासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -राजेश गिते

 ओबीसी आरक्षणासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -राजेश गिते



परळी (प्रतिनिधी) -    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.या निकालामुळे ओबीसी समाजात प्रचंड असंतोष आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले त्या मुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल विरोधात गेला अशी ओबीसी समाजाची भावना आहे . 

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव तथा ओबीसी नेत्या मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचे जाहिर केले आहे.

या अनुषंगाने मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी २६जुन रोजी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येणार आहे

मा. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा नेते राजेश गिते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या