MB NEWS-चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा-फुलचंद कराड

 चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा-फुलचंद कराड  



परळी (प्रतिनिधी):- राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. या न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसी समाजात प्रचंड असंतोष आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, पदोन्नतीचे आरक्षण कायम ठेवावे यासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव तथा ओबीसी नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी 26 जुन रोजी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड  यांनी केले आहे.

          राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल विरोधात गेला अशी ओबीसी समाजाची भावना आहे.

      या अनुषंगाने पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येणार आहे.

            पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या चक्का जाम आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार