पोस्ट्स

MB NEWS-विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक

इमेज
  विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक   परळी दि. ६ ऑक्टोबर..... महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींसाठी ऑनलाईन कामगार काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर २१ रोजी करण्यात आले होते. औरंगाबाद, लातूर व नांदेड या गटातून ३६ कवींच्या प्रवेशिका आल्या होत्या. पैकी  ३२ कामगार कवींनी कवितांचे सादरीकरण केले.  या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून  एकाहून एक सरस सुंदर कविता कामगार कवींनी  सादर केल्या.  कामगार कवींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींची काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न केले.  या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रूपये २ हजार, द्वितीय पारितोषिक १ हजार पाचशे, तृतीय पारितोषिक १ हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये आहे.   या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजय कुमार पांचाळ औरंगाबाद, तृतीय पारितोषिक (विभागून) केशव कुकडे परळी वैजनाथ, बिपिन रा

MB NEWS-राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय - धनंजय मुंडे*

इमेज
 * राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय - धनंजय मुंडे*  *राज्यातील 50 महाविद्यालयातील 562 शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना होणार लाभ; आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास मिळाली मंजुरी* मुंबई (दि. 06) ---- : राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.  एकूण अनुदानित 50 महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल असे 562 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेण्या 1 जानेवारी 2016 पासून लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनु

MB NEWS- *नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था* 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी

इमेज
 नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या  भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी _ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्री देवी दर्शनाला जाणार्या परळीतीलभाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे.या सुविधेचा अधिकाधिक भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.        नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ,आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी, काळरात्री देवी  दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते. भाविकांना दर्शनासाठी जाण्या-येण्याची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मोफत वाहन व्यवस्था  केली आहे. नवरात्रोत्सवात सकाळी ८ ते  दुपारी ४ या वेळेत मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध असणार आहे.या सुविधेचा लाभ अधिकाधिक भाविकभक्तांनी घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष

MB NEWS-*परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार*

इमेज
  *परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार* परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदीडॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ह्रदय  सत्कार करण्यात आला.         परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी व  वैद्यकीय क्षेत्रात  मोठे कार्य असलेल्या डॉ.अरूण गुट्टे यांची  वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे   नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या नियुक्ती बद्दल हभप गणेश महाराज उखळीकर यांनी त्यांचा ह्रदय सत्कार केला.याप्रसंगी प्रभाकर आंधळे, दत्ताभाऊ देशमुख, विठ्ठल राव गुट्टे, नाथराव गुट्टे, डॉ.जीवनराव गुट्टे, सुनील योगीराज गुट्टे आदी उपस्थित होते.

MB NEWS-परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती

इमेज
  परळी उपजिल्हा रूग्णालया च्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी दि.4 ऑक्टोंबर 2021 रोजी नियुक्ती करण्यात आली. पालकंमत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी नियुक्तीचे आदेश दिले. परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी असून वैद्यकीय क्षेत्रात डॉ.अरूण गुट्टे यांचे मोठे कार्य आहे. या पुर्वीही डॉ.अरूण गुट्टे यांनी वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे काम पाहिले आहे. परळी उपजिल्हा रूग्णालयाला महाराष्ट्र शासनाचा डॉ.आनंदीबाई जोशी हा मानाचा पुरस्कार डॉ.अरूण गुट्टे  यांनी मिळवून दिला होता. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांची पुन्हा वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन

इमेज
 श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन पत्रकार प्रा.रविंद्र जोशी यांना पितृशोक परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          श्रीराम मंदिरचे पुजनसेवासाधक तथा उखळी बु.येथील  प्रतिष्ठीत व परिसरातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व श्री. भास्करराव नरहरराव जोशी (उखळीकर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या  पार्थिवावर उखळी (बु.) येथे  बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.          श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) हे अतिशय धार्मिक, मनमिळाऊ, संयमी व कुटुंबवत्सल म्हणून परिचित होते. सर्वदूर परिचय, धार्मिक, पौरोहित्य क्षेत्रात जीवनभर कार्यरत होते.त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.जोशी (उखळीकर) परिवाराचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. परभणी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक दिनकरराव जोशी, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते हभप बाळु (सुरेंद्र) महाराज उखळीकर यांचे ते वडील होत. गेल्या पंधरा दिवसांपासून लातुर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्या

MB NEWS-वाढदिवस विशेष:शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते

इमेज
  शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते  परळी- परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले.स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण,समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे राजेश गित्ते.  कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित्ते यांच्याकडे बालपणापासुनच नेतृत्वगुण वाढत गेले.विद्यार्थीदशेत अनेक उपक्रम,आंदोलनात सहभाग नोंदवत हे युवानेतृत्व फुलत गेले.सर्वांना सोबत घेवुन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे अगदी कमी वयात त्यांनी आपल्या बेलंबा गावचे सरपंच होण्याचा मान पटकावला.इतर सरपंचाप्रमाणे केवळ

MB NEWS-तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

इमेज
  तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)           येथील तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता.०५) आर्य वैश्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते. हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.                  येथील तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा व नियुक्ती समारंभाचे आयोजन आर्य वैश्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी महाराज व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीतेली समाजातील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या व कोविड काळात मुंबई येथील धारावी व लोकमान्य टिळक दवाखान्यात  समाजातील डॉ रेणूका फुटके यांनी सेवा दिल्याबद्दल व परभ

MB NEWS-माजी नगरसेविका शोभनाताई बद्दर यांचे दुःखद निधन जेष्ठ पञकार दिलिप बद्दर यांना पत्नी शोक

इमेज
  माजी नगरसेविका शोभनाताई बद्दर यांचे दुःखद निधन जेष्ठ पञकार दिलिप बद्दर यांना पत्नी शोक परळी वै...  शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभनाताई दिलिपराव बद्दर यांचे आज दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन त्या जेष्ठपञकार दिलिपराव बद्दर यांच्या पत्नी होत. शोभनाताई बद्दर यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार आज सायंकाळी 5 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहे. शोभनाताई बद्दर यांच्या पश्चात पती,दोन मुली एक मुलगा, दिर जावा असा मोठा परिवार आहे.बद्दर परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी  न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS- *करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू*

इमेज
 *करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी      जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. तर या प्रकरणातील अन्य एक आरोपी असलेल्या अरुण मोरे यांस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयामध्ये वकील पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.       राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बेछुट आरोप करुन परळीत पत्रकार परिषद घेऊन सत्य जगासमोर आणण्याचा दावा करून  काल दि.५ रोजी परळी मध्ये दाखल झालेल्या करुणा शर्मा यांची काही महिलांसोबत बाचाबाची झाली.  त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याप्रमाणे करुणा शर्मा यांच्या गाडीची झडती घेतली असता एक पिस्तूल आढळून आला होता. परळी शहर पोलीस ठाण्यात करूणा शर्मा यांच्याव

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

इमेज
 *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे.  परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सु

MB NEWS- *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !*

इमेज
 *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !* अध्यात्ममाने मनशुद्धी होते,सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शक - अजय मुंडे _नामवंत किर्तनकारांची परळीत मांदियाळी_ परळी......ता. २ - शेमारो मराठी बाणा व नाथ प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित स्व. पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते श्री. माऊली गडदे, नगरसेवक गोपाळराव आंधळे, प्रा. अतुल दुबे, संयोजक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, सूर्यकांत मुंडे उपस्थित होते.अध्यात्ममाने मनशुद्धी होते व सर्व धर्म सम भाव आणि सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शकच आहेत असे यावेळी श्री. मुंडे म्हणाले.परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

MB NEWS-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली

इमेज
  सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिला नसल्याने २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू के ली जाईल. राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य सरकारने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका  सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. राज्यात सध्या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उपमु

MB NEWS-नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही-ना. धनजंय मुंडे*

इमेज
 * बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधांवर* *नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही-ना. धनजंय मुंडे*  *आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ, पीकविमा कंपनी सह संयुक्त पंचनाम्यांचे निर्देश*     बीड, ( जिमाका) दि. २:- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना. मुंडेंनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.  आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावाचा पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिक

MB NEWS-परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला*(VIDEO

इमेज
  परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला जलसाठे भरत असल्याने  समाधानाचे वातावरण परळी वैजनाथ | प्रतिनिधी. .........         परळी तालुक्यातील  कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस सुरू  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.     बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....                  *        दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  प

MB NEWS-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे* _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_

इमेज
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे  _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_ *परळी वै.दि.१ प्रतिनिधी*      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही. किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.      २०२० चा खरीप पिक विमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी बुधवारी (ता.१) सकाळी दहा वाजता भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषी मंत्री भुसे यांच्यासह, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेनी मोर्चा काढुन दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याअनुषांगाने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषीमंत्र्यांनी किसान सभेच्या

MB NEWS- *बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर

इमेज
बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर 🕳️  _परळी प्रखंड कार्यकारीणी जाहीर;दहा जणांना नियुक्त्या_  🕳️ परळी वैजनाथ, प्रतिनिधी........            विश्व हिंदू परिषदे अंतर्गत परळी प्रखंडाच्या कार्यकारीणी ची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या शुभ मुहूर्तावर (दि.   ३०।०८।२०२१-२२ सोमवार) रोजी विश्व हिंदू परिषद चा ५७ वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परळी-वैद्यनाथ प्रखंड समिती कार्यकारिणीतील  नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्री मुरलीजी जयस्वानी, श्री. प्रा. कवी, जिल्हा उपाध्यक्ष बीड श्री. संभाजी भणगे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत  परळी प्रखंड कार्यकारिणीच्या दहा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. नितीन बालासाहेब राजूरकर (बजरंगदल शहर संयोजक), श्री मिरकिले साहेब (प्रखंड धर्मचार्य प्रमुख),श्री वैभव धोंड  (परळी शहर मंत्री), श्री रविंद्र  दुर्गादास वेताळ(

MB NEWS- बीड:जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन*

इमेज
  जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन बीड : दि 1 प्रतिनिधी बीड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी तथा भावसार समाजाचे सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे बुधवार दि 1 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भावसार समाजाचे सर्वपरिचित असे व्यक्तिमत्त्व तथा शहरातील मे.नारायणराव पतंगे क्लाथ सेंटर चे मालक श्री.जगन्नाथ पतंगे यांचे सकाळी 7 वाजता त्यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.मृत्यू समयी त्यांचे वय 62 होते.त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा,2 विवाहित मुली,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  बीड शहरातील जुन्या पिढीतील मनमिळवू,शांत व्यक्तीमत्व म्हणून व्यापारीवर्गात व भावसार समाजात त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

MB NEWS- *ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम;सपोनि एम.एस.मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया*

इमेज
 ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम;सपोनि एम.एस.मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......           ग्रामीण पोलीसांची दारुबंदी मोहीम जोरदार सुरू झाली आहे.सपोनि एम.एस. मुंडे यांच्या धाडी टाकून दारु अड्ड्यांवर बेधडक कारवाया करण्यात आल्या आहेत. आज दि.१ रोजी तालुक्यातील धारावती तंडा येथे धाडी टाकून 59800 रुपये चा मुद्देमाल जप्त करुन रसायने व द्रव्ये नाहीसे केले.या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.             आज दि.१ रोजी सकाळी 09:00 ते 11:00 वा. दरम्यान धारावती तंडा येथे सपोनि एम एस मुंडे, फौजदार तोटेवाड व ग्रामीण पो स्टे चे इतर 15 अंमलदार यांनी मिळून दारुबंदी मोहीमचे अनुषंगाने अख्खा गाव पिंजून काढून धाडी टाकल्या.यामध्ये एकूण 5 आरोपी नामे शेषबाई भगवान पवार,धुराबाई बाबुराव राठोड,अनिता बळीराम जाधव,वामन राम पवार,शामराव प्रभू पवार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. या धाडीमध्ये 59800 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच गुळ मिश्रित फसफसते रसायन,गावठी हातभट्टी ची तयार दारू, लोखंडी टंकी, प्लास्टिकचे हंडे व इतर साहित्य मिळून आले.योग्य सॅम्पल घेऊन इतर

MB NEWS-सरस्वती गित्ते यांचे बी.एस. एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश

इमेज
  सरस्वती गित्ते यांचे बी.एस. एल.एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...             येथील प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट लक्ष्मण गित्ते यांची मुलगी सरस्वती गित्ते हिने एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी घेत घवघवीत यश संपादन केले आहे. गित्ते परिवारात वडीलांनंतर आता दुसरी वकील होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.      सरस्वती लक्ष्मण गित्ते यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले. दयानंद काॅलेज लातुर येथे त्यांनी लाॅ चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी बेलंबा येथे,जगमित्र विद्यालयात १०वी तर १२ वी पर्यंत चे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथे झाले आहे. आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून सरस्वती यांनी अतिशय मेहनत घेत वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार गित्ते यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न

इमेज
  वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून सत्कार संपन्न परळी वैजनाथ - ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान अंतर्गत वेद पाठशाळा,वारकरी शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल परळी चे भूमिपुत्र वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांचा सत्कार करण्यात आला.मित्र परिवाराच्या वतीने या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञाचक्षु प.पु. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान अंतर्गत वेद पाठशाळा व वारकरी शिक्षण संस्था पाथर्डी जि.अहमदनगर या संस्थेवर संचालक म्हणून वेदमूर्ती तुकाराम चिक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल चिक्षे यांचा पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र दगडगुंडे,मनोज रामदासी,मुरलीधर धर्माधिकारी, स्वानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चिक्षे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०२ तर जिल्ह्यात ९५पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०२ तर जिल्ह्यात ९५पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०२ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ९५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-*ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ*(VIDEO) 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_

इमेज
  *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ* 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे.आज दि.२७ रोजी सकाळच्या सत्रात धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे.वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत प्राणप्रतिष्ठापुर्व पुजा संपन्न होत आहेत. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात चार दिवस हा सोहळा होणार आहे.समारोपदिनी दि.३० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.          परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृह हे काम हाती घेण्यात आले होते. मंदिर व सभागृहाचे काम पूर्ण झाले असून या प

MB NEWS-राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे

इमेज
  राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे संत भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु - खा.डाॅ.प्रितमताई मुंडे   🕳️ जयंतीनिमित्त पंकजाताई व प्रितमताईंनी केलं परळीतील निवासस्थानी अभिवादन 🕳️    परळी वैजनाथ, प्रतिनिधी......            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असल्याचे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले.तर राष्ट्रसंतश्रेष्ठ भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु असा विश्वास खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी अभिवादन केले. पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरवर "महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असलेले राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन !!" अशा शब

MB NEWS- *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण !*

इमेज
 ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण ! 🕳️   _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळयाचे आयोजन_  🕳️  *प.पु.सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.या अनुषंगाने परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयाचे आयोजन केले आहे.वेदोक्त पद्धतीने विधिवत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व समारोपदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.           परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मि