MB NEWS-वाढदिवस विशेष:शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते

 शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते

 परळी-

परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले.स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण,समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे राजेश गित्ते.

 कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित्ते यांच्याकडे बालपणापासुनच नेतृत्वगुण वाढत गेले.विद्यार्थीदशेत अनेक उपक्रम,आंदोलनात सहभाग नोंदवत हे युवानेतृत्व फुलत गेले.सर्वांना सोबत घेवुन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे अगदी कमी वयात त्यांनी आपल्या बेलंबा गावचे सरपंच होण्याचा मान पटकावला.इतर सरपंचाप्रमाणे केवळ कार्यकाळ पुर्ण करण्यासाठी कार्य न करता सरपंच पदावरुन गावचा कसा विकास करता येतो हे त्यांनी दाखवुन दिले.याच काळात त्यांनी सरपंच पदावरुन काम करताना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर केलेल्या कार्यामुळे राजेश गित्ते यांना आजही "सरपंच " या नावानेच ओळखले जाते.या सरपंच पदाच्या कार्यकाळापासुन त्यांच्या सामाजीक,राजकिय कार्याची घोडदौड खर्या अर्थाने सुरु झाली.राजकिय पक्षातील अनेक पदे भुषवुन आपल्या नेतृत्वाचे आदेश शिरसावंद्य मानत कार्य केले.हे कार्य करत असताना स्वाभिमान व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही यासाठी प्रसंगी पक्षनेतृत्वाचा रोषही पत्कारला.स्वच्छ प्रतिमा,दिलेला शब्द पाळणे,सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलने करणे याचा त्यांना अनेकवेळा त्रास झाल्याने बॅकफुटवरही जावे लागले परंतु काळ्या मातीशी असलेली नाळ व सर्वांना सोबत घेवुन जाण्याची वृत्ती यामुळे हे नेतृत्व अशा अडथळ्यातुन बाहेर आलेले आहे.यासाठी त्यांचे बंधु धनंजय,प्रा.अजय व बलभिम यांची मोलाची साथ लाभतेय नव्हे तर राजेश गित्ते यांची खरी ताकद ही एकसंघ कुटुंब आहे.  

 राजेशजी यांच्याशी माझा परिचय काही वर्षापुर्वीच झालेला सुरुवातीच्या काही भेटीतच त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलु दिसले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणुन त्यांचे राजकिय कार्य जवळून अनुभवले राष्ट्रवादी कॉंग्रेसचा परळी तालुक्यात विस्तार करताना त्यांनी अनेकवेळा शेतकरी,निराधार,युवकांच्या प्रश्नावर आवाज उठवला.राज्य पातळीवरील नेत्यांशी थेट संबंध असताना त्यांनी इतर राजकीय नेत्याप्रमाणे विकासकामांचे कंत्राट घेण्यासाठी कधीच प्रतिष्ठा लावली नाही प्रतिष्ठा लावली ती सामान्यांच्या प्रश्नासाठी.भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुक्यात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यपध्तीवर कार्य करत परळीच्या ग्रामीण भागातील प्रश्न गित्ते हाताळत आहेत.ओल्या दुष्काळाने पिके नासलेली किंवा कोरड्या दुष्काळात करपलेल्या पिकांची शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी आंदोलने करत सातत्याने पाठपुरावा करत आहेत.राजकिय,सामाजीक क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.आपले वडील कै.प्रा.एच.पी.गित्ते सर यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त आपल्या बेलंबा या गावी अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा,किर्तन,प्रवचन अशी धार्मिक क्षेत्रातील स्थानिक किर्तनकाराबरोबर महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार,प्रवचनकारांची उपलब्धतता केली.यामध्ये त्यांनी केवळ धार्मिकच नव्हे तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव,महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणुन शिलाई मशीन वाटप,पर्यावरणाचे संतुलन रहावे यासाठी हजारो रोपटे वाटप करुन सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. 

 सर्व क्षेत्रात आपल्या कार्याची पताका रोवण्यार्या मित्रवर्याचा आज 11 सप्टेंबर रोजी वाढदिवस.वाढदिवसानिमित्त  मनःपूर्वक शुभेच्छा !


        - धनंजय आढाव 

          परळी- वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !