इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS- *करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू*

 *करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात स्वतःच मांडली बाजू* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

    जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. तर या प्रकरणातील अन्य एक आरोपी असलेल्या अरुण मोरे यांस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयामध्ये वकील पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.

      राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बेछुट आरोप करुन परळीत पत्रकार परिषद घेऊन सत्य जगासमोर आणण्याचा दावा करून  काल दि.५ रोजी परळी मध्ये दाखल झालेल्या करुणा शर्मा यांची काही महिलांसोबत बाचाबाची झाली.  त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याप्रमाणे करुणा शर्मा यांच्या गाडीची झडती घेतली असता एक पिस्तूल आढळून आला होता. परळी शहर पोलीस ठाण्यात करूणा शर्मा यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आज (दि.६) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेल्या अरुण मोरे यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायालय कामकाजात सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले तर करुणा शर्मा यांचे वकील न्यायालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतःच न्यायालयासमोर आपली बाजू मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या