MB NEWS-परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती

 परळी उपजिल्हा रूग्णालया च्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती



परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी दि.4 ऑक्टोंबर 2021 रोजी नियुक्ती करण्यात आली. पालकंमत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी नियुक्तीचे आदेश दिले. परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी असून वैद्यकीय क्षेत्रात डॉ.अरूण गुट्टे यांचे मोठे कार्य आहे. या पुर्वीही डॉ.अरूण गुट्टे यांनी वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे काम पाहिले आहे. परळी उपजिल्हा रूग्णालयाला महाराष्ट्र शासनाचा डॉ.आनंदीबाई जोशी हा मानाचा पुरस्कार डॉ.अरूण गुट्टे  यांनी मिळवून दिला होता. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांची पुन्हा वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार