MB NEWS- *नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था* 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या  भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था

🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्री देवी दर्शनाला जाणार्या परळीतीलभाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे.या सुविधेचा अधिकाधिक भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

       नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ,आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी, काळरात्री देवी  दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते. भाविकांना दर्शनासाठी जाण्या-येण्याची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मोफत वाहन व्यवस्था  केली आहे. नवरात्रोत्सवात सकाळी ८ ते  दुपारी ४ या वेळेत मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध असणार आहे.या सुविधेचा लाभ अधिकाधिक भाविकभक्तांनी घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. या वाहन सुविधेसाठी ड्रायव्हर मो.क्र.९८५०६९२८१४ तसेच मो.क्र. ७२७६६८९०९०, ९६०७६८९०९० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

ना.धनंजय मुंडे यांचे आभार.....

        दरम्यान,परळी-घाटनांदुर या रत्याचे काम घाटनांदुर पासून परळीकडे प्रगतिपथावर आहे.या कामाचे भूमिपूजन ना.धनंजय मुंडे यांच्याच्या हस्ते संपन्न झाले होते.मात्र दक्षिणमुखी गणेशमंदिर परळी पासून अद्याप कामाची सुरुवात नव्हती.नवरात्रोत्सवात आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते.राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांना ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे,माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले आणि शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश चौण्डे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व नगरसेवकांनी मागणी केली होती की दक्षिणमुखी गणेश मंदिर परळी ते डोंगरतुकाई हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा तसेच तूर्त या रत्याचे खड्डे बुजवून नवरात्रोत्सवा निमित्त डागडुजी व्हावी. ना.धनंजय मुंडे  यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता ए.डी.कुलकर्णी यांना सिमेंट कॉन्क्रीट रस्ता सुरु करण्याबाबत सूचना दिल्या आणि शिवाजी भैय्या शिरसाठ आणि नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांना या रस्त्याची नवरात्रोत्सवानिमित्त डागडुजी करण्याचे सूचित केले.शिवाजी भैय्या शिरसाठ यांनी कालपासून सदर रोडवर मुरुम टाकून खड्डे बुजवून रोलर करण्यासबंधी युद्ध पातळीवर यंत्रणा लावली आहे.लवकरच दक्षिणमुखी गणेशमंदिर परळी ते आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी हा "हाइब्रिड एन्युटी" या योजनेत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता सुरु होणार असून या रोडवर दोन्ही बाजूंनी पथदिवे देखील आहेत. याबद्दल ना.धनंजय मुंडे,शिवाजी शिरसाठ व वाल्मिकअण्णा कराड यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !