MB NEWS-तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

 तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न



परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)

          येथील तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता.०५) आर्य वैश्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते. हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

       


         येथील तेली युवक संघटना, श्री.शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा व नियुक्ती समारंभाचे आयोजन आर्य वैश्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी महाराज व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीतेली समाजातील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या व कोविड काळात मुंबई येथील धारावी व लोकमान्य टिळक दवाखान्यात  समाजातील डॉ रेणूका फुटके यांनी सेवा दिल्याबद्दल व परभणी येथील आदर्श शिक्षक सुधीर सोनुनकर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. नंतर समाजातील जवळपास २७ शिक्षक व शिक्षीकांचा सन्मान शिक्षक दिनानिमित्त करण्यात आला. या समारंभास महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे सेवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तथा निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष पन्हाळे, मप्रांतिकचे नांदेड विभाग अध्यक्ष डॉ.रावसाहेब राऊत, विभागीय सचिव पांडुरंग शिंदे, युवा आघाडीचे  सुधीर सोनुनकर,युवा आघाडी राज्य संघटक विठ्ठल रनबावरे, शंकर फुटके,  आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेली युवक संघटना, शनैश्वर प्रतिष्ठान व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार