इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक

 विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक 


 परळी दि. ६ ऑक्टोबर.....

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींसाठी ऑनलाईन कामगार काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर २१ रोजी करण्यात आले होते. औरंगाबाद, लातूर व नांदेड या गटातून ३६ कवींच्या प्रवेशिका आल्या होत्या. पैकी  ३२ कामगार कवींनी कवितांचे सादरीकरण केले.

 या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून  एकाहून एक सरस सुंदर कविता कामगार कवींनी  सादर केल्या.

 कामगार कवींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींची काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न केले.

 या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रूपये २ हजार, द्वितीय पारितोषिक १ हजार पाचशे, तृतीय पारितोषिक १ हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये आहे. 

 या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजय कुमार पांचाळ औरंगाबाद, तृतीय पारितोषिक (विभागून) केशव कुकडे परळी वैजनाथ, बिपिन राठोड चौफाळा नांदेड, तृतीय पारितोषिक (विभागून) महेश होणमाने परळी वैजनाथ, बद्रीनाथ भालगडे कोतवालपूरा औरंगाबाद, उत्तेजनार्थ पारितोषिक (विभागून) बालाजी कापसे कळंब, महानंदा केंद्रे परभणी या कामगार कवींनी मिळविली आहे.

कवींच्या वैयक्तिक बँक खात्यावर बक्षिसाची रक्कम जमा करण्यात आले आहे.

प्रथम पारितोषिक मिळवलेले कामगार कवीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून स्पर्धा मुंबई येथे होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कामगार कवींसाठी संपूर्ण खर्च कामगार कल्याण मंडळ करणार आहे. 

 या काव्यवाचन स्पर्धेचे परिक्षण डॉ. हबीब भंडारे, आशा खडतरे(डांगे) यांनी केले.

नांदेडचे कामगार कल्याण अधिकारी  प्रसाद धस लातूरचे भालचंद्र जगदाळे  यांनी विशेष सहकार्य केले.

 स्पर्धेचे सूत्रसंचालन विजय अहिरे, सुवर्णा कुलकर्णी यांनी केले. आभार महेश विभांडीक यांनी मानले. तांत्रिक साहाय्य दिनकर पाटील, दिज्ञेश पाटील, स्वप्नील मोरे, श्यामकांत पाटील, रवींद्र पडोल यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!