इंदपवाडीच्या शाळेत बालसभेत झाला ऋषिकेशचा सत्कार

इमेज
माझा कंटाळा आई-वडिलांकडे पाहिलं की आपोआप निघून जायचा - अग्निवीर ऋषिकेशने दिली विद्यार्थ्यांना प्रेरणा! इंदपवाडीच्या शाळेत बालसभेत झाला ऋषिकेशचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी तालुका परळी वैजनाथ येथे नव्या शैक्षणिक वर्षातील पहिली बाल सभा गुरुवारी संपन्न झाली. पहिल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सातवी वर्गाची विद्यार्थिनी कु आनंदी विष्णू मुंडे ही निवड करण्यात आली होती.  बालसभेचा यावेळचा विषय होता माझी शाळा. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गावचे सुपुत्र ऋषिकेश बिबीशन मुंडे ज्यांची नुकतीच आर्मीमध्ये निवड झाली आहे. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष केशवराव मुंडे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष केंद्रे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अग्निवीर म्हणून आर्मीमध्ये निवड झालेल्या ऋषिकेश बिबीशन मुंडे यांचा वडिलांसह सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता पाचवी वर्गातून शिष्यवृत्तीसाठी पास झालेली विद्यार्थिनी मानवी माणिक मुंडे हीच ही यावेळी सन्मान करण्यात आला.  इयत...

MB NEWS-श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन

 श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन

पत्रकार प्रा.रविंद्र जोशी यांना पितृशोक



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         श्रीराम मंदिरचे पुजनसेवासाधक तथा उखळी बु.येथील  प्रतिष्ठीत व परिसरातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व श्री. भास्करराव नरहरराव जोशी (उखळीकर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या  पार्थिवावर उखळी (बु.) येथे  बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

         श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) हे अतिशय धार्मिक, मनमिळाऊ, संयमी व कुटुंबवत्सल म्हणून परिचित होते. सर्वदूर परिचय, धार्मिक, पौरोहित्य क्षेत्रात जीवनभर कार्यरत होते.त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.जोशी (उखळीकर) परिवाराचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. परभणी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक दिनकरराव जोशी, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते हभप बाळु (सुरेंद्र) महाराज उखळीकर यांचे ते वडील होत. गेल्या पंधरा दिवसांपासून लातुर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने धार्मिक, सांस्कृतीक, विविध स्तरातुन शोकभावना व्यक्त होत आहेत.

      *आज अंत्यसंस्कार*

              दरम्यान,श्री.भास्करराव जोशी (उखळीकर)तयांच्या  पार्थिवावर मुळगावी उखळी (बु.) येथे  आज बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या