पोस्ट्स

MB NEWS-*ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आज स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व* 🕳️ _*मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_

इमेज
  *ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आज स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व* 🕳️ _*मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृहाचा लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.      परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या अंबेवेस भागातील श्री. काळाराम मंदिर येथे  परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह उभारणी झालेले आहे. त्याचबरोबर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा श्री. काळाराम मंदिर अंतर्गत जिर्णोद्धार, सजावट व सुशो

MB NEWS-दिपावली निमित्ताने डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवास सायकल भेट

इमेज
  दिपावली निमित्ताने डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवास सायकल भेट  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिपावलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवास सायकल भेट देऊन दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. डॉ. संतोष मुंडे यांचे दिव्यांग बांधवासाठीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.          गुरुवार,दि.04 नोव्हेंबर रोजी दिपावलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधव रणजित रायभोळे यांना सायकल भेट देऊन दिव्यांग बांधवासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. डॉ. संतोष मुंडे यांनी दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करत तसेच वेळोवेळी त्यांनी दिव्यांग बांधवांचे अडीअडचणी ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात असे ही ना.मु

MB NEWS-केदारनाथ मंदिराच्या कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचा जनतेसोबत ऑनलाईन सहभाग* *परळीत भाजपतर्फे वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर दाखवले लाईव्ह प्रक्षेपण*

इमेज
 * केदारनाथ मंदिराच्या कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचा जनतेसोबत ऑनलाईन सहभाग* *परळीत भाजपतर्फे वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर दाखवले लाईव्ह प्रक्षेपण* परळी ।दिनांक ०५।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी केदारनाथ मंदिर परिसराच्या विकास कामांचे उद्घाटन मोठया थाटात झाले. या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे शहरातील जनतेसोबत ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.       शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर भाजपच्या वतीने हा कार्यक्रम नागरिकांसाठी लाईव्ह दाखविण्याची सोय करण्यात आली होती, त्यासाठी मोठा स्क्रीन देखील लावण्यात आला होता.  त्याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.  आदि शंकराचार्य जिथे जिथे  गेले आहेत तिथे त्यांनी ८७ मंदिरे बांधली आहेत ज्यात ४ धाम, १२ ज्योतिर्लिंगे आणि मंदिराचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्यांच्या समाधीसह विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण केले.  *पंकजाताईंचा सहभाग* ------------ पंकजाताई मुंडे यांना या कार्यक्रमात ऐनवेळी विमान रद्द झाल्याने सहभागी होता आले नाही, त्यामुळे त्यांनी यात जनतेसोबत ऑनलाईन सहभाग घ

MB NEWS- *धनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन साजरे* *व्यापारपेठेत फिरून दिल्या विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा*

इमेज
 *धनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन साजरे* *व्यापारपेठेत फिरून दिल्या विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा* परळी (दि. 04) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रति वर्षी प्रमाणे आपले लक्ष्मीपूजन परळी शहरातील व्यापारी व विविध व्यवसायिकांसमवेत साजरे केले. ना. मुंडे यांनी परळी शहरातील संपूर्ण बाजारपेठेत पायी फिरून प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात जाऊन सर्व व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या.  मागील अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे हे आपली दिवाळी याचप्रमाणे साजरी करतात. परळी शहरातील मोंढा, कापड लाईन,सोनार लाईन आदी संपूर्ण बाजारपेठ ना.मुंडे यांनी पायी फिरून कापड दुकान, आडत, किराणा, कृषी निविष्ठा, सुवर्णकार, खाजगी डॉक्टर्स यांसह विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या. तर मंत्री झाल्यानंतर देखील धनंजय मुंडे हे स्वतः पायी फिरून आपल्या दुकानात येऊन आपल्याला शुभेच्छा देतात, ना.मुंडे यांनी कायम पाय जमिनीवर ठेऊन इथल्या नागरिकांशी नाते जपले असल्याच्या भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.  यावेळी

MB NEWS-परळी शहरात वाढत असलेल्या चोरीच्या व गुन्हेगारीच्या घटनांना तात्काळ आळा बसवा - शिवश्री देवराव लुगडे महाराज.*

इमेज
 * परळी शहरात वाढत असलेल्या चोरीच्या व गुन्हेगारीच्या घटनांना तात्काळ आळा बसवा - शिवश्री देवराव लुगडे महाराज.* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरात मागील काही महिन्यापासून वाढत चाललेल्या चोरीच्या व गुन्हेगारीच्या घटना सातत्याने होत आहेत. यावर प्रशासनाने तात्काळ आळा बसवावा व ह्या घटना यापुढे घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच मागील काही महिन्यांपासून परळी शहरातील सीसीटीव्ही पूर्णपणे बंद पडलेली आहे ती सीसीटीव्ही तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून चोरीच्या घटना मध्ये वाढ झाली असून  परळी शहरात 140 गाढवांची चोरी झाली ते 140 गाढव हे वीट भट्टी च्या कामासाठी आणले होते. दिवाळीनंतर ते गाढव वीट भट्टी च्या कामासाठी वापरली जातात. आज त्या गाढवांचे मालक पूर्णपणे रस्त्यावर आले आहेत. अमोल मोरे नामक व्यक्तीचे दहा गाढव होते त्याने वीट भट्टी वरून दोन लाखाची उचल घेऊन गाढव खरेदी केले‌ आज ते गाढव चोरीला गेले आहेत त्या व्यक्तीने काय करायचे ? कारण वीटभट्टी मालकाकडून घेतलेली उचल पूर्णपणे गाढव खरेदी करण्

MB NEWS-परळीत गाढवांमुळे खळबळ;150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार: गाढवं चोरीची मोठी घटना ; पोलीसांना आव्हान(Video)

इमेज
  परळीत गाढवांमुळे खळबळ;150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार: गाढवं चोरीची मोठी घटना ; पोलीसांना आव्हान परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ओळख असलेल्या पाळीव गाढवांच्या अचानक गायब होण्याच्या घटनेने गर्दभपालक चिंतातुर झाले आहेत.परळीत गाढवांमुळे खळबळ उडाली आहे.शहरातुन अंदाजे 150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.गाढवं चोरीची मोठी घटना समोर आल्याने या चोरीच्या प्रकरणात तपासाचे शहरातील पोलीसांना आव्हान निर्माण झाले आहे.       परळी शहरात पारंपरिक पद्धतीने भोई समाज आणि बेलदार समाजाकडे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर पाळीव गाढवं आहेत. विविध कामांमध्ये तसेच साहित्य वाहतूक करण्यासाठी या गाढवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.बांधकामे, वीट उद्योग, मातीकाम,रेती काम  मोठ्या जनसमुहाच्या उदरनिर्वाहसाठी वापरात येणाऱ्या जवळपास 150 गाढवांची चोरी झाली असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.यामुळे गर्दभपालक चिंतातुर झाले आहेत. शहर पोलीस ठाण्यात तसेच संभाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. याप्रकरणी आता विविध सामाजिक संघटना पुढे येत असुन याप्रकरणी तप

MB NEWS-श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम

इमेज
  श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम  सिरसाळा , प्रतिनिधी :- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दि. 28/10/2021, गुरुवार रोजी "मिशन युवा स्वास्थ" अभियानांतर्गत कोविड-19 लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा डॉ. हरिभाऊ कदम, तर प्रमुख उपस्थितीत डॉ. एम बी धोंडगे हे उपस्थित होते. तसेच सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी श्री राऊत साहेब, परदेशी मॅडम, नागरगोजे मॅडम, मुंढे मॅडम, श्री जाधव साहेब हे उपस्थित होते.प्रसंगी प्राचार्य डॉ हरीभाऊ कदम यांनी कोविड-19 लसीकरणाचे महत्त्व विषद केले. उद्घाटनानंतर लगेच प्रत्यक्ष लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत ऐकून 42 विद्यार्थ्यानी लसीकरनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जयदिप सोळंके यांनी, सुत्रसंचालन प्रा. दयानंद झिंझुर्डे तर आभार प्रा. अरुणा वाळके यांनी मानले.ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MB NEWS-दिवाळीच्या तोंडावर खोळंबा: परळी बस आगारातून एकही बस सुटली नाही;एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण

इमेज
  दिवाळीच्या तोंडावर खोळंबा: परळी बस आगारातून एकही बस सुटली नाही;एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून परळी येथे एसटी कामगारांनीही गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. एसटीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवासाचा खोळंबा झाला आहे.       एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी , दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज पहाटे 4.30 वाजेपासून परळी आगारातील

MB NEWS- *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️

इमेज
 *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️  परळीवैजनाथ, प्रतिनिधी....         बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.           धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे दि. 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत हा याग सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात धार्मिक क्षेत्रातील उच्चपदस्थ संत- महंत यांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये कर्नाटकमधिल स्वामी संकेश्वर मठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्या नृसिंह भारती, प.पु द्वाराचार्य महामंडल

MB NEWS- 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकांचे प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान वेबसाईटचे उद्घाटन

इमेज
 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकाचे  प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन सोलापुर (प्रतिनिधी) महेश कोटिवाले लिखित महिमा श्री वडवालसिध्द नागनाथांचा या पुस्तकांचे प्रकाशन  आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन संपन्नसंतवाॾ:मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तामहाराज आंधळे यांचे हस्ते  मान्यवरांच्या उपस्थितीत दस-याच्या शुभमुहूर्तावर श्रीश्रेत्र वडवाल येथे संपन्न झाले. श्रीनागनाथ देवस्थान पंचकमेटी यांनी या नेत्रदिपक सोहळयाचे आयोजन केले होते. या  प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड दत्ता महाराज आंधळे म्हणाले की,नागेश संप्रदाय हा सर्वसमावेशक आणि समन्वयक असलेला संप्रदाय असून याचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.नागनाथ देवस्थान पंचकमेटी स्तुत्य उपक्रम आणि समाज उपयोगी योजना राबवित असल्याबाबत पंचकमेटी चे कौतुक केले.याकार्यक्रमास खर्गेमहाराज,पोपट शिवपुजे महाराज,आकाश शिवपुजे महाराज,राजेंद्रबुवाखर्गे महाराज, पोलिस निरिक्षक आकाश सायकर, नागनाथ देवस्थान पंचकमेटी अध्यक्ष श्री श्रीकांत शिवपुजे,लेखक महेश कोटिवाले,ॲड हिंदुराव देशमुख,आण्णासाहेब देशमुख , पोलिस पाटिल दादा काकडे,

MB NEWS-*स्व. पंडितअण्णा मुंडे स्मृतीप्रित्यर्थ हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता*

इमेज
  *स्व. पंडितअण्णा मुंडे स्मृतीप्रित्यर्थ हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता* *ह.भ.प. समाधान महाराज केजकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता* *स्व.पंडित अण्णांच्या स्मृतींनी धनंजय मुंडे भावुक* परळी (दि. 17) ---- : बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कृषी महर्षी स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या 5 व्या पुण्यतिथीनिमित्त मुंडे परिवाराच्या वतीने मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या श्री वाणीतून सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची आज सांगता झाली.  या सप्ताहाच्या सांगतेवेळी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (केजकर) यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. बालयोगी हरिहर महाराजांच्या वाणीतून भागवत कथेचा शेवट व त्यानंतर संगीत विशारद ह.भ.प. शर्मा महाराज यांचे संगीतमय सुश्राव्य कीर्तन यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह मुंडे कुटुंबीय, नाथरा व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी ना. धनंजय मुंडे यांनी स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे नाथरा निवासस्थान येथील स्मृतीशिल्प त

MB NEWS-राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन

इमेज
  राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन परळी (प्रतिनिधी-) राधा-मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने कोजागिरी पोर्णीमेच्या दिवशी दूधातून घेण्यासाठीचे दमा आजारावरील मोफत औषधींचे वितरण करण्यात येत आहे. बीड येथील आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री (बाबूजी) यांनी सदरचे औषध तयार केले असून मागील अनेक वर्षापासून त्याचे वितरण करण्यात येते. दमा आजारावर अत्यंत प्रभावशाली औषध त्यांनी तयार केले असून कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी परळीतील दमा रुग्णांसाठी औषधी दिली जाणार असल्याचे राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. दमा आजाराने अनेकांना विविध प्रकारचे औषध घेऊनसुद्धा गुण येत नसल्याची तक्रार असते. परंतु बीड येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री यांनी तयार केलेली औषधी मागील 75 वर्षापासून दिली जात असून त्याचा दमा आजारावर योग्य उपार झाल्याचे अनेकांनी सांगीतलेले आहे. सदरील औैषधी उपयुक्त असल्याने बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मागील अनेक वर्षापासून को

MB NEWS- *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_*

इमेज
 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_* प्रतिनिधी।परळी वैजनाथ दि.17- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती. 1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उत्तम

MB NEWS-सेवानिवृत उत्तमराव महिपती गित्ते यांचे निधन प्रकाश गित्ते यांना पितृशोक

इमेज
  सेवानिवृत उत्तमराव महिपती गित्ते यांचे निधन प्रकाश गित्ते यांना पितृशोक परळी वै प्रतिनिधी  एस.टी.महामंडळाचे सेवानिवृत कर्मचारी उत्तमराव महिपती गित्ते यांचे एकादशी निमित्ताने पंढरपुर येथे देव दर्शनासाठी गेले असता आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास -हदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.मृत्यू समयी त्याचे वय 70 वर्ष होते. उत्तमराव महिपती गित्ते हे दर महिण्याला पंढरपुरची वारी करत असत. काल एकादशी निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठलाचे दर्शनासाठी पोहचले असता त्यांना अचानक -हदयविकाराचा मोठा धक्का बसला आणी त्यातच त्यांची प्राणजोत माळवली.एस.टी महामंडळात त्यांनी मॕकॕनिक म्हणुन सेवा दिली आहे.अतिषय धार्मिक,सांप्रादायीक आणी सुस्वभावी व्यक्ती म्हणुन सर्वत्र सुपरिचित होते.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैद्यनाथ बॕकेच्या वडवणी शाखेचे कर्मचारी प्रकाश गित्ते यांचे ते वडिल होत.वैकुंठवासी उत्तमराव महिपती गित्ते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,एक मुलगी सुना,नातवंडं असा भरगच्च परिवार आहे.

MB NEWS-हेळंब येथे आज ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे किर्तन होणार

इमेज
  हेळंब येथे आज ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर  यांचे किर्तन होणार  स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन ह.भ.प.दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या किर्तनाने भाविक झाले मंत्रमुग्ध परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील ज्येष्ठ नागरिक तथा गावचे माजी उपसरपंच स्व.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि.16 व 17 आँक्टोंबर रोजी भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाळवदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.            परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी पाशाकुशा एकादशी दि.27 आँक्टोंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली होती.त्यानिमित्ताने समाधी सोहळा व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्व.माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागात सर्वापरिचित व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्याच्या मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व होते. मित्ती अश्विन शु.11 पाशांकु

MB NEWS-हेळंब येथे स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ह.भ.प.दतात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन होणार

इमेज
  हेळंब येथे स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ह.भ.प.दतात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन होणार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील ज्येष्ठ नागरिक तथा गावचे माजी उपसरपंच स्व.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि.16 व 17 आँक्टोंबर रोजी भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी  किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाळवदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.            परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी पाशाकुशा एकादशी दि.27 आँक्टोंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली होती.त्यानिमित्ताने समाधी सोहळा व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्व.माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागात सर्वापरिचित व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्याच्या मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व होते. मित्ती अश्विन शु.11 पाशांकुशा एकादशी शके 1943

MB NEWS-वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजाताई मुंडे🕳️

इमेज
आपला दसरा-आपली परंपरा: भगवान भक्ती गडावर लोटला अलोट जनसागर ! * पंकजाताई मुंडेंच्या चौकार, षटकारांनी सत्ताधारी घायाळ!* * वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजाताई मुंडे* * मंदिरं, रूग्णालयाच्या स्वच्छतेसह तरूणांना व्यसनमुक्तीचा दिला नवा संकल्प* पाटोदा ।दिनांक १५। आई जशी मुलाची दृष्ट काढते तसा मी पदर तुमच्यावरुन ओवाळला. जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन, तुमच्याशिवाय कोण आहे माझं ? अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय पंकजाताई मुंडे यांनी आज दसरा मेळाव्यात भावनिक साद घातली. मराठा-ओबीसी आरक्षण, उसतोड कामगार, अतिवृष्टीबाधित शेतकरी, जिल्हयातील सत्ताधाऱ्यांची कारस्थानं, व्यसनमुक्तीचा नवा संकल्प अशा विविध चौफेर विषयांवर त्यांचे आजचे भाषण लक्षवेधी ठरले.     राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावरील पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे गाजला. आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, आज विजयादशमी आहे दसरा आणि दसऱ्याची आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा ही कायम ठेवण्यासाठी या उन्हात घरची पुरणपोळी सोडून तुम्ही सर्वजण येथे उपस्थित झाला

MB NEWS-परळीत तीन रिवॉल्वर व आठ काडतुसे सापडली

इमेज
  परळीत तीन रिवॉल्वर व आठ काडतुसे सापडली परळी (प्रतिनीधी) परळी शहरात आज (दि.15) रोजी दसर्याच्या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी शहरातुन तीन अत्याधुनिक रिवॉल्वर व आठ काडतुसे जप्त केल्याची माहिती हाती आली असुन या प्रकरणात मध्य प्रदेश येथील एकास ताब्यात घेतले आहे.याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.   परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकरवी देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर तीन अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुडडे, गोविंद भताने,श्रीकांत राठोड मधुकर निर्मळ यांनी केली. ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातील एका एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी ही कार्यवाही केली. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली ज

MB NEWS- *बीड जिल्हयात अराजकता पसरवाल तर जनता दुर्गेचं रूप घेईल - पंकजाताई मुंडेंचा जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना इशारा* *अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास गावा-गावात आंदोलन पोहोचू* *जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचं धरणं आंदोलन*

इमेज
 * बीड जिल्हयात अराजकता पसरवाल तर जनता दुर्गेचं रूप घेईल - पंकजाताई मुंडेंचा जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना इशारा* *अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास गावा-गावात आंदोलन पोहोचू* *जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचं धरणं आंदोलन*  बीड । दिनांक१३। बीड जिल्हा उभा करण्यासाठी खूप कष्ट लागले, सत्तेत असतांना  जिल्हयाच्या भवितव्याचा प्लॅन आम्ही तयार केला होता, तो तुम्ही बिघडवू नका, इथली संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अराजकता पसरविण्याचा प्रयत्न कराल तर जनता दुर्गेचं रूप घेऊन तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हय़ातील सत्ताधारी नेत्यांना आज दिला. दरम्यान, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दस-यापूर्वी नुकसान भरपाई देऊन त्यांची दिवाळी गोड करा अन्यथा रस्त्यावरचे हे आंदोलन गावा-गावात पोहोचू असेही त्या म्हणाल्या. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपालांची भेट*

इमेज
 *पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपालांची भेट* *अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई , विमा अन् बीडमधील 'माफिया राज' बंद करण्याबाबत दिले निवेदन* मुंबई । दिनांक ११। बीडसह मराठवाडयातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना विमा मिळावा आणि बीड जिल्हयातील 'माफिया राज' संपुष्टात आणावा या मागणीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रविवारी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.   नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने बीडसह मराठवाडयातील सर्वच जिल्हयातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अतिवृष्टीत काढणीला आलेली पिके संपूर्ण उध्वस्त झाली असून जमिनीची माती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी पशूधन वाहून गेली तर अनेकांना यात आपला प्राण गमवावा लागला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची गरज असल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा अशी मागणी यावेळी पंकजात

MB NEWS-विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक

इमेज
  विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक   परळी दि. ६ ऑक्टोबर..... महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींसाठी ऑनलाईन कामगार काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर २१ रोजी करण्यात आले होते. औरंगाबाद, लातूर व नांदेड या गटातून ३६ कवींच्या प्रवेशिका आल्या होत्या. पैकी  ३२ कामगार कवींनी कवितांचे सादरीकरण केले.  या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून  एकाहून एक सरस सुंदर कविता कामगार कवींनी  सादर केल्या.  कामगार कवींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींची काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न केले.  या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रूपये २ हजार, द्वितीय पारितोषिक १ हजार पाचशे, तृतीय पारितोषिक १ हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये आहे.   या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजय कुमार पांचाळ औरंगाबाद, तृतीय पारितोषिक (विभागून) केशव कुकडे परळी वैजनाथ, बिपिन रा

MB NEWS-राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय - धनंजय मुंडे*

इमेज
 * राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय - धनंजय मुंडे*  *राज्यातील 50 महाविद्यालयातील 562 शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना होणार लाभ; आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास मिळाली मंजुरी* मुंबई (दि. 06) ---- : राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.  एकूण अनुदानित 50 महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल असे 562 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेण्या 1 जानेवारी 2016 पासून लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनु

MB NEWS- *नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था* 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी

इमेज
 नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या  भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी _ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्री देवी दर्शनाला जाणार्या परळीतीलभाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे.या सुविधेचा अधिकाधिक भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.        नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ,आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी, काळरात्री देवी  दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते. भाविकांना दर्शनासाठी जाण्या-येण्याची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मोफत वाहन व्यवस्था  केली आहे. नवरात्रोत्सवात सकाळी ८ ते  दुपारी ४ या वेळेत मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध असणार आहे.या सुविधेचा लाभ अधिकाधिक भाविकभक्तांनी घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष

MB NEWS-*परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार*

इमेज
  *परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार* परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदीडॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ह्रदय  सत्कार करण्यात आला.         परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी व  वैद्यकीय क्षेत्रात  मोठे कार्य असलेल्या डॉ.अरूण गुट्टे यांची  वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे   नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या नियुक्ती बद्दल हभप गणेश महाराज उखळीकर यांनी त्यांचा ह्रदय सत्कार केला.याप्रसंगी प्रभाकर आंधळे, दत्ताभाऊ देशमुख, विठ्ठल राव गुट्टे, नाथराव गुट्टे, डॉ.जीवनराव गुट्टे, सुनील योगीराज गुट्टे आदी उपस्थित होते.

MB NEWS-परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती

इमेज
  परळी उपजिल्हा रूग्णालया च्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी दि.4 ऑक्टोंबर 2021 रोजी नियुक्ती करण्यात आली. पालकंमत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी नियुक्तीचे आदेश दिले. परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी असून वैद्यकीय क्षेत्रात डॉ.अरूण गुट्टे यांचे मोठे कार्य आहे. या पुर्वीही डॉ.अरूण गुट्टे यांनी वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे काम पाहिले आहे. परळी उपजिल्हा रूग्णालयाला महाराष्ट्र शासनाचा डॉ.आनंदीबाई जोशी हा मानाचा पुरस्कार डॉ.अरूण गुट्टे  यांनी मिळवून दिला होता. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांची पुन्हा वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.