इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन* 🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️

 *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन*

🕳️ _भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन_🕳️

 परळीवैजनाथ, प्रतिनिधी....

        बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

          धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे दि. 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत हा याग सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात धार्मिक क्षेत्रातील उच्चपदस्थ संत- महंत यांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये कर्नाटकमधिल स्वामी संकेश्वर मठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्या नृसिंह भारती, प.पु द्वाराचार्य महामंडलेश्वर अमृतआश्रम स्वामी महाराज,बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराज, वसमत येथील वेदांताचार्य ष.ब्र. 108 दिगंबर शिवाचार्य महाराज आदी संत उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी परळी येथील वैद्यनाथ मंदिर चे क्षेत्र उपाध्याय पं. नितीनगुरु राजूरकर मो.क्र.९१७५५९५९३०, ९४०५८१५००७, महेशगुरु पारगांवकर मो.क्र.९५२७८५८१११ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या