MB NEWS- 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकांचे प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान वेबसाईटचे उद्घाटन

 'महिमा श्री वडवालसिद्ध नागनाथांचा 'या पुस्तकाचे प्रकाशन आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन



सोलापुर (प्रतिनिधी)


महेश कोटिवाले लिखित महिमा श्री वडवालसिध्द नागनाथांचा या पुस्तकांचे प्रकाशन  आणि श्रीनागनाथ देवस्थान  वेबसाईटचे उद्घाटन संपन्नसंतवाॾ:मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तामहाराज आंधळे यांचे हस्ते  मान्यवरांच्या उपस्थितीत दस-याच्या शुभमुहूर्तावर श्रीश्रेत्र वडवाल येथे संपन्न झाले.


श्रीनागनाथ देवस्थान पंचकमेटी यांनी या नेत्रदिपक सोहळयाचे आयोजन केले होते. या  प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड दत्ता महाराज आंधळे म्हणाले की,नागेश संप्रदाय हा सर्वसमावेशक आणि समन्वयक असलेला संप्रदाय असून याचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.नागनाथ देवस्थान पंचकमेटी स्तुत्य उपक्रम आणि समाज उपयोगी योजना राबवित असल्याबाबत पंचकमेटी चे कौतुक केले.याकार्यक्रमास खर्गेमहाराज,पोपट शिवपुजे महाराज,आकाश शिवपुजे महाराज,राजेंद्रबुवाखर्गे महाराज, पोलिस निरिक्षक आकाश सायकर, नागनाथ देवस्थान पंचकमेटी अध्यक्ष श्री श्रीकांत शिवपुजे,लेखक महेश कोटिवाले,ॲड हिंदुराव देशमुख,आण्णासाहेब देशमुख , पोलिस पाटिल दादा काकडे, ऋतुराज कोटिवाले व सर्व भाविक व ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिति होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !