इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-केदारनाथ मंदिराच्या कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचा जनतेसोबत ऑनलाईन सहभाग* *परळीत भाजपतर्फे वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर दाखवले लाईव्ह प्रक्षेपण*

 *केदारनाथ मंदिराच्या कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचा जनतेसोबत ऑनलाईन सहभाग*



*परळीत भाजपतर्फे वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर दाखवले लाईव्ह प्रक्षेपण*


परळी ।दिनांक ०५। 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी केदारनाथ मंदिर परिसराच्या विकास कामांचे उद्घाटन मोठया थाटात झाले. या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे शहरातील जनतेसोबत ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. 


     शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर भाजपच्या वतीने हा कार्यक्रम नागरिकांसाठी लाईव्ह दाखविण्याची सोय करण्यात आली होती, त्यासाठी मोठा स्क्रीन देखील लावण्यात आला होता.  त्याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. 

आदि शंकराचार्य जिथे जिथे  गेले आहेत तिथे त्यांनी ८७ मंदिरे बांधली आहेत ज्यात ४ धाम, १२ ज्योतिर्लिंगे आणि मंदिराचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्यांच्या समाधीसह विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण केले. 


*पंकजाताईंचा सहभाग*

------------

पंकजाताई मुंडे यांना या कार्यक्रमात ऐनवेळी विमान रद्द झाल्याने सहभागी होता आले नाही, त्यामुळे त्यांनी यात जनतेसोबत ऑनलाईन सहभाग घेतला. पंतप्रधानांचे भाषण संपल्यावर त्यांनी उपस्थित जनतेला दिवाळी, पाडवा व भाऊबीज सणाच्या शुभेच्छा दिल्या.   यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ज्येष्ठ नेते दत्तापा इटके, राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, बाबुराव मेनकुदळे, श्रीराम मुंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या