MB NEWS-परळी शहरात वाढत असलेल्या चोरीच्या व गुन्हेगारीच्या घटनांना तात्काळ आळा बसवा - शिवश्री देवराव लुगडे महाराज.*

 *परळी शहरात वाढत असलेल्या चोरीच्या व गुन्हेगारीच्या घटनांना तात्काळ आळा बसवा - शिवश्री देवराव लुगडे महाराज.*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी शहरात मागील काही महिन्यापासून वाढत चाललेल्या चोरीच्या व गुन्हेगारीच्या घटना सातत्याने होत आहेत. यावर प्रशासनाने तात्काळ आळा बसवावा व ह्या घटना यापुढे घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच मागील काही महिन्यांपासून परळी शहरातील सीसीटीव्ही पूर्णपणे बंद पडलेली आहे ती सीसीटीव्ही तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून चोरीच्या घटना मध्ये वाढ झाली असून  परळी शहरात 140 गाढवांची चोरी झाली ते 140 गाढव हे वीट भट्टी च्या कामासाठी आणले होते. दिवाळीनंतर ते गाढव वीट भट्टी च्या कामासाठी वापरली जातात. आज त्या गाढवांचे मालक पूर्णपणे रस्त्यावर आले आहेत. अमोल मोरे नामक व्यक्तीचे दहा गाढव होते त्याने वीट भट्टी वरून दोन लाखाची उचल घेऊन गाढव खरेदी केले‌ आज ते गाढव चोरीला गेले आहेत त्या व्यक्तीने काय करायचे ? कारण वीटभट्टी मालकाकडून घेतलेली उचल पूर्णपणे गाढव खरेदी करण्यात व इतर काही वस्तू खरेदी करण्यात खर्च झाले  या पुढील उदरनिर्वाह कसा भागवायचा व पुन्हा दोन लाखाचे गाढव कुठून खरेदी करायचे ? आज जवळजवळ काही कुटुंब गाढव चोरीला गेले म्हणून उघड्या वरती आलेले आहेत आज ते कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले असून त्या कुटुंबाच्या पुढे या पुढे काय करायच हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण डबल उचल वीटभट्टी मालक देणार नाही आणि गाढव चोरीला गेले आहेत तर पैसा आणायचा कुठून आणि गाढव खरेदी करणार कशी कारण त्यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह हा गाढवावरच अवलंबून आहे त्यांच्या मदतीनेच वीटभट्टीवर काम करण्यासाठी होत असतो पण या घटनेमुळे खचलेल्या मनस्थितीत ते कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालेले  आहेत याचीसुद्धा नोंद प्रशासनाने घ्यावी. कारण अशा घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत मागच्या काही महिन्यापूर्वी गाई चोरीला गेल्या होत्या त्या गाई चा तपास आजतागायत लागला नाही त्यानंतर काही मनोरुग्ण लोकांनी गाड्यांची तोडफोड केली होती त्याचा शोध पण आजतागायत लागला नाही अस ऐकवात आहे. चार दिवसापूर्वी एका व्यक्तीचे मोटरसायकलच्या डिकीतून एक लाख रुपये चोरीला गेले आहेत तसेच मोबाईल चोरी  सणासुदीच्या काळात मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ गर्दीचा फायदा घेऊन इतर बऱ्याच काही चोरीच्या घटनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पोलीस प्रशासनाने जागृत व सगज राहून अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी व परळी शहर भय मुक्त करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. अशा घटना जर नाही थांबल्या तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रात दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !