MB NEWS-राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन

 राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दमा आजारावर आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांच्या औषधींचे मोफत वितरण

रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे संयोजकांचे आवाहन
परळी (प्रतिनिधी-)
राधा-मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने कोजागिरी पोर्णीमेच्या दिवशी दूधातून घेण्यासाठीचे दमा आजारावरील मोफत औषधींचे वितरण करण्यात येत आहे. बीड येथील आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री (बाबूजी) यांनी सदरचे औषध तयार केले असून मागील अनेक वर्षापासून त्याचे वितरण करण्यात येते. दमा आजारावर अत्यंत प्रभावशाली औषध त्यांनी तयार केले असून कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी परळीतील दमा रुग्णांसाठी औषधी दिली जाणार असल्याचे राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले.
दमा आजाराने अनेकांना विविध प्रकारचे औषध घेऊनसुद्धा गुण येत नसल्याची तक्रार असते. परंतु बीड येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री यांनी तयार केलेली औषधी मागील 75 वर्षापासून दिली जात असून त्याचा दमा आजारावर योग्य उपार झाल्याचे अनेकांनी सांगीतलेले आहे. सदरील औैषधी उपयुक्त असल्याने बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मागील अनेक वर्षापासून कोजागिरी पोर्णिमेनिमित्त ही औषधे मोफत दिली जातात.
दमा रुग्णांना सदरची औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून कोजागिरी पोर्णिमा म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा. सदरील दमा आजारावरचे औषध दिले जाणार आहे. यासाठी रुग्णांना काही नियम व अटींचे पथ्य म्हणून पालन करावे लागणार आहे. रुग्णांनी शक्य तो दिवसभर उपवास करावा, वयस्कर व्यक्तींनी दुपारनंतर जेवण करु नये किंवा फळे खावीत तसेच चांगले तापवून ठेवलेले किंवा आटवलेले दूध चंद्राच्या चांदण्यात ठेवावे, चंद्रप्रकाश दूधावर कमीत कमी तीन तास पडावा तसेच रात्री 12 वा. चांदण्यात ठेवलेल्या दूधात औषधी मिसळून घ्यावीत अशी सूचना आयुर्वेदाचार्य चंदुलालजी कलंत्री यांनी केले आहे.
कोजागिरीचे दूध आणि औषधी वैद्यनाथ सहकारी औद्योगीक वसाहत कार्यालय, नाथ रोड परळी येथे रात्री 11 वा. मोफत दिली जाणार आहेत. याकरिता नाव नोंदणी आवश्यक असून यासाठी  पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. अजय पुजारी-9850437354, आनंद हडबे-9850213019, राजेश मोदाणी-9970030144, अनंत भाग्यवंत-9130072189  येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !