इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-*ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आज स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व* 🕳️ _*मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_

 *ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आज स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व*



🕳️ _*मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी*_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृहाचा लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

     परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या अंबेवेस भागातील श्री. काळाराम मंदिर येथे  परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह उभारणी झालेले आहे. त्याचबरोबर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा श्री. काळाराम मंदिर अंतर्गत जिर्णोद्धार, सजावट व सुशोभीकरण कार्य करण्यात आले आहे. दिपावलीच्या पावन पर्वात याठिकाणी करण्यात आलेल्या नेत्रदीपक कामांचे लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते शनिवार दि.६नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. करण्यात येणार आहे.

       दिपावलीच्या पावन पर्वावर  स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृहाचा लोकार्पण समारंभ तसेच दिपावली स्नेहपर्व कार्यक्रम होणार आहे.दिपावली स्नेहभेट, शुभेच्छांचे आदानप्रदान व स्नेहीजनांचे एकत्रित स्नेहमिलन असे या समारंभाचे स्वरुप असणार आहे. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या