MB NEWS-श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम

 श्री पार्डीकर महाविद्यालयात 'कोविड-19 लसीकरण' मोहिम 

सिरसाळा , प्रतिनिधी :- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दि. 28/10/2021, गुरुवार रोजी "मिशन युवा स्वास्थ" अभियानांतर्गत कोविड-19 लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा डॉ. हरिभाऊ कदम, तर प्रमुख उपस्थितीत डॉ. एम बी धोंडगे हे उपस्थित होते. तसेच सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी श्री राऊत साहेब, परदेशी मॅडम, नागरगोजे मॅडम, मुंढे मॅडम, श्री जाधव साहेब हे उपस्थित होते.प्रसंगी प्राचार्य डॉ हरीभाऊ कदम यांनी कोविड-19 लसीकरणाचे महत्त्व विषद केले.

उद्घाटनानंतर लगेच प्रत्यक्ष लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत ऐकून 42 विद्यार्थ्यानी लसीकरनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जयदिप सोळंके यांनी, सुत्रसंचालन प्रा. दयानंद झिंझुर्डे तर आभार प्रा. अरुणा वाळके यांनी मानले.ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !