MB NEWS-हेळंब येथे आज ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे किर्तन होणार

 हेळंब येथे आज ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर  यांचे किर्तन होणार 



स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन



ह.भ.प.दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या किर्तनाने भाविक झाले मंत्रमुग्ध


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील ज्येष्ठ नागरिक तथा गावचे माजी उपसरपंच स्व.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि.16 व 17 आँक्टोंबर रोजी भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाळवदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

           परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी पाशाकुशा एकादशी दि.27 आँक्टोंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली होती.त्यानिमित्ताने समाधी सोहळा व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्व.माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागात सर्वापरिचित व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्याच्या मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व होते. मित्ती अश्विन शु.11 पाशांकुशा एकादशी शके 1943 शनिवार, दि.16 आँक्टोंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजता ह.भ.प.दतात्रय महाराज आंधळे (संतवाड़मयाचे संशोधक) यांचे किर्तन संपन्न झाले. तसेच शनिवार, दि.16 आँक्टोंबर रोजी रात्रौ 8 ते 10 वाजता ह.भ.प.रामराव महाराज ढोक (रामायणाचार्य, नागापूरकर) यांचे किर्तन  तर दुसऱ्या दिवशी रविवार,दि.17 आँक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ता.कराड, जि.सातारा यांचे किर्तन होणार आहे. तसेच किर्तनानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील  ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी समाधी सोहळा व किर्तन महोत्सवातील सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी हेळंब (परळी ते धर्मापुरी रोडवर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती तारामती माणिकराव पाळवदे,  प्रा.नारायण माणिकराव पाळवदे, राम माणिकराव पाळवदे (उपसरपंच, हेळंब), प्रा.डॉ. नागोराव माणिकराव पाळवदे व पाळवदे परिवार (9766478444, 9763526197, 8432653777) यांनी केले आहे.




ह.भ.प.दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या किर्तनाने भाविक झाले मंत्रमुग्ध

           स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवात ह.भ.प.दत्तात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन संपन्न झाले. यावेळी भाविकांची संख्या लक्षणीय होती.त्याच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द भाविक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.या भव्य किर्तन महोत्सवात ह.भ.प. दत्तात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.दरम्यान,किर्तनाचा व भोजनाचा लाभ भाविकांनी घेतला.पाळवदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !