MB NEWS- *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत* *_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_*

 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष; ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत*

*_असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे - शरद हेबाळकर_*


प्रतिनिधी।परळी वैजनाथ दि.17- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती.


1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उत्तम कांदे,तालुका संघचालक डॉ.अजित केंद्रे व उपस्थित स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदना केली.या महोत्सवसाठी परळी तालुक्यातील स्वयंसेवक तथा राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळीत या वर्षी विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य पथसंचलन करण्यात आले.घोष पथकाने सर्वांचे लक्ष वेधले तर संचलनादरम्यान राष्ट्रप्रेमींनी ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.हे पथसंचलन औद्योगिक वसाहत सभागृह येथुन सुरू होऊन पुढे नाथ चित्र मंदिर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक,विद्यानगर,शंभू महादेव मंदिर,श्री गजानन महाराज मंदिर परिसर,जलालपूर रोड मार्गे औद्योगिक वसाहत येथे या संचलनाची सांगता करण्यात आली.या संचलनासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार