MB NEWS-दिपावली निमित्ताने डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवास सायकल भेट

 दिपावली निमित्ताने डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवास सायकल भेट 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिपावलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवास सायकल भेट देऊन दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. डॉ. संतोष मुंडे यांचे दिव्यांग बांधवासाठीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.

         गुरुवार,दि.04 नोव्हेंबर रोजी दिपावलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधव रणजित रायभोळे यांना सायकल भेट देऊन दिव्यांग बांधवासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. डॉ. संतोष मुंडे यांनी दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करत तसेच वेळोवेळी त्यांनी दिव्यांग बांधवांचे अडीअडचणी ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात असे ही ना.मुंडे म्हणाले. तसेच उपक्रमांचे कौतुक केले. दिवाळीचा इतर खर्च न करता दिव्यांग बांधवास सायकल भेट देऊन दिव्यांग बांधवाची दिवाळी अपंगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी गोड केली आहे. यावेळी न.प.गटनेते वाल्मीक (आण्णा) कराड, डॉ.एकनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, नगरसेवक दिपक देशमुख,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सौळंके, जमिल अध्यक्ष, सुरेश टाक, नगरसेवक विजय भोयटे, दिपक तांदळे ,  राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !