इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीत गाढवांमुळे खळबळ;150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार: गाढवं चोरीची मोठी घटना ; पोलीसांना आव्हान(Video)

 परळीत गाढवांमुळे खळबळ;150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार: गाढवं चोरीची मोठी घटना ; पोलीसांना आव्हान

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ओळख असलेल्या पाळीव गाढवांच्या अचानक गायब होण्याच्या घटनेने गर्दभपालक चिंतातुर झाले आहेत.परळीत गाढवांमुळे खळबळ उडाली आहे.शहरातुन अंदाजे 150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.गाढवं चोरीची मोठी घटना समोर आल्याने या चोरीच्या प्रकरणात तपासाचे शहरातील पोलीसांना आव्हान निर्माण झाले आहे.

      परळी शहरात पारंपरिक पद्धतीने भोई समाज आणि बेलदार समाजाकडे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर पाळीव गाढवं आहेत. विविध कामांमध्ये तसेच साहित्य वाहतूक करण्यासाठी या गाढवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.बांधकामे, वीट उद्योग, मातीकाम,रेती काम  मोठ्या जनसमुहाच्या उदरनिर्वाहसाठी वापरात येणाऱ्या जवळपास 150 गाढवांची चोरी झाली असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.यामुळे गर्दभपालक चिंतातुर झाले आहेत. शहर पोलीस ठाण्यात तसेच संभाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. याप्रकरणी आता विविध सामाजिक संघटना पुढे येत असुन याप्रकरणी तपास करुन गर्दभपालकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे.पोलीस प्राथमिक तपास करीत आहेत.

                           Video








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या