MB NEWS- *धनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन साजरे* *व्यापारपेठेत फिरून दिल्या विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा*

 *धनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन साजरे*

*व्यापारपेठेत फिरून दिल्या विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा*


परळी (दि. 04) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रति वर्षी प्रमाणे आपले लक्ष्मीपूजन परळी शहरातील व्यापारी व विविध व्यवसायिकांसमवेत साजरे केले. ना. मुंडे यांनी परळी शहरातील संपूर्ण बाजारपेठेत पायी फिरून प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात जाऊन सर्व व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. 


मागील अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे हे आपली दिवाळी याचप्रमाणे साजरी करतात. परळी शहरातील मोंढा, कापड लाईन,सोनार लाईन आदी संपूर्ण बाजारपेठ ना.मुंडे यांनी पायी फिरून कापड दुकान, आडत, किराणा, कृषी निविष्ठा, सुवर्णकार, खाजगी डॉक्टर्स यांसह विविध व्यावसायिक व व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या. तर मंत्री झाल्यानंतर देखील धनंजय मुंडे हे स्वतः पायी फिरून आपल्या दुकानात येऊन आपल्याला शुभेच्छा देतात, ना.मुंडे यांनी कायम पाय जमिनीवर ठेऊन इथल्या नागरिकांशी नाते जपले असल्याच्या भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. 


यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्यासह जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, बाजरी समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, जि. प. सदस्य प्रा। मधुकरराव आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, नगरसेवक दिपक देशमुख, शकील कुरेशी, जयप्रकाश लड्डा, संजय फड, जयपाल लाहोटी, सूर्यभाननाना मुंडे, शंकर कापसे, विजय भोयटे, सय्यद सिराज, बालाजी वाघ, प्रा. विनोद जगतकर, शंकर आडेपावर, दिलीप कराड, भावड्या कराड, सुरेश टाक, माऊली मुंडे, अतुल मुंडे,  वैजनाथ सोळंके, आयुब पठाण, गोपाळ आंधळे, चेतन सौन्दळे, सुरेश नानवटे, ज्ञानेश्वर होळंबे, यांसह विविध आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत भेटी गाठी व शुभेच्छांचे सत्र सुरूच होते!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !