MB NEWS-सेवानिवृत उत्तमराव महिपती गित्ते यांचे निधन प्रकाश गित्ते यांना पितृशोक

 सेवानिवृत उत्तमराव महिपती गित्ते यांचे निधन

प्रकाश गित्ते यांना पितृशोक

परळी वै प्रतिनिधी 

एस.टी.महामंडळाचे सेवानिवृत कर्मचारी उत्तमराव महिपती गित्ते यांचे एकादशी निमित्ताने पंढरपुर येथे देव दर्शनासाठी गेले असता आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास -हदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.मृत्यू समयी त्याचे वय 70 वर्ष होते.

उत्तमराव महिपती गित्ते हे दर महिण्याला पंढरपुरची वारी करत असत. काल एकादशी निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठलाचे दर्शनासाठी पोहचले असता त्यांना अचानक -हदयविकाराचा मोठा धक्का बसला आणी त्यातच त्यांची प्राणजोत माळवली.एस.टी महामंडळात त्यांनी मॕकॕनिक म्हणुन सेवा दिली आहे.अतिषय धार्मिक,सांप्रादायीक आणी सुस्वभावी व्यक्ती म्हणुन सर्वत्र सुपरिचित होते.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वैद्यनाथ बॕकेच्या वडवणी शाखेचे कर्मचारी प्रकाश गित्ते यांचे ते वडिल होत.वैकुंठवासी उत्तमराव महिपती गित्ते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,एक मुलगी सुना,नातवंडं असा भरगच्च परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार