दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-हेळंब येथे स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ह.भ.प.दतात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन होणार

 हेळंब येथे स्व.माणिकराव पाळवदे यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे आयोजन

ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ह.भ.प.दतात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन होणार 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील ज्येष्ठ नागरिक तथा गावचे माजी उपसरपंच स्व.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि.16 व 17 आँक्टोंबर रोजी भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी  किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाळवदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

           परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी पाशाकुशा एकादशी दि.27 आँक्टोंबर 2020 रोजी देवाज्ञा झाली होती.त्यानिमित्ताने समाधी सोहळा व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्व.माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागात सर्वापरिचित व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्याच्या मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व होते. मित्ती अश्विन शु.11 पाशांकुशा एकादशी शके 1943 शनिवार, दि.16 आँक्टोंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजता ह.भ.प.दतात्रय महाराज आंधळे (संतवाड़मयाचे संशोधक) यांचे किर्तन होणार आहे. तसेच शनिवार, दि.16 आँक्टोंबर रोजी रात्रौ 8 ते 10 वाजता ह.भ.प.रामराव महाराज ढोक (रामायणाचार्य, नागापूरकर) यांचे किर्तन होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रविवार,दि.17 आँक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ह.भ.प.संतचरण बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ता.कराड, जि.सातारा यांचे किर्तन होणार आहे. तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील  ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी समाधी सोहळा व किर्तन महोत्सवातील सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी हेळंब (परळी ते धर्मापुरी रोडवर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती तारामती माणिकराव पाळवदे,  प्रा.नारायण माणिकराव पाळवदे, राम माणिकराव पाळवदे (उपसरपंच, हेळंब), प्रा.डॉ. नागोराव माणिकराव पाळवदे व पाळवदे परिवार (9766478444, 9763526197, 8432653777) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....