पोस्ट्स

MB NEWS:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला 'लग्नाच्‍या बेडीत'!

इमेज
  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला 'लग्नाच्‍या बेडीत'!           पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कराचीमधील एका पाकिस्तानी महिलेशी लग्‍न केले आहे. यासंदर्भातील माहिती दाऊद इब्राहिमच्या भाच्याने दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिलेल्या माहितीत डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने दिली आहे. हसीना पारकरच्‍या मुलाची ‘एनआयए’ला माहिती दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने ‘एनआयए’ दिलेल्‍या माहितीत सांगितले आहे की, दाऊद इब्राहिम याने दुसरे लग्न केले  आहे. त्‍याने अद्याप पहिली पत्नी मेहजाबीन शेख हिला घटस्फोट दिलेला नाही. एनआयएने धडक कारवाई करत  दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित लोकांना अटक केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्रही सादर केले होते. अली शाहने ‘एनआयए’ला सांगितले आहे की, दाऊद इब्राहिमने अद्याप त्याची पहिली पत्नी मेहजाबीन शेखला घटस्फोट दिलेला नाही. दाऊदचे दुसरे लग्न म्हणजे मेहजाबीनवरून तपास यंत्रणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्

MB NEWS:हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतूनश्रीमद् भागवत कथामालेचे आयोजन !

इमेज
हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथामालेचे आयोजन ! बीड – येथील श्रीमद् भागवत कथा संयोजन समितीच्या वतीने आणि विविध धार्मिक संस्थांच्या सहभागाने सद्गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमोघ वानीतून 5 फेब्रुवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधी दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक अलौकिक सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बीडमध्ये राम कृष्ण लॉन्स मंगल कार्यालयातील वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न धोंडीराज शास्त्री महाराज पटांगणकर नगरी मध्ये या भागवत कथेच्या आयोजन करण्यात आले असून शुभारंभ प्रसंगी ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर ,अमृता आश्रम महाराज, योगीराज गोसावी महाराज पैठण यांची उपस्थित राहणार असून समारोप करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे . या सात दिवसात दरम्यान विविध संस्थांचे महाराज संत उपस्थित राहणार असून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे कथा स्थानी आरोग्य शिबीरही सात दिवस चालणार असून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व

MB NEWS:स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह:आज सायं. 6 : 00 वा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान

इमेज
 स्व.श्यामरावज देशमुख स्मृतिसमारोह:आज सायं. 6 : 00 वा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान परळी, दि. 16/01/2023 (प्रतिनिधी)    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांचे ' जीवन सुंदर आहे ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.समाज मनातील विकृती बाजूला सारून संस्काराचा दीप प्रज्वलित करत संस्कार करणारे व सकारात्मक विचारांची पेरणी करून जीवन उज्ज्वल करणारे असे हे व्याख्यान आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे ज्येष्ठ संचालक,  अनिलराव देशमुख ; सचिव, रवींद्र देशमुख ; कोषाध्यक्ष , प्रा. प्रसाद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य,डॉ. एल. एस. मुंडे; स्मृतिसमारोहाचे समन्वयक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड ,प्रा.कल्याणकर राजश्री ,प्रा. क्षितिजा देशपांडे ,प्रा. डॉ.

MB NEWS:इंद्रधनु कला आकादमी, परभणी यांचा उपक्रम

इमेज
  दगडवाडीत रंगली इंद्रधनु रंगरेखा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा इंद्रधनु कला आकादमी, परभणी यांचा उपक्रम परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दगडवाडी येथे इंद्रधनु कला आकादमीच्या वतीने इंद्रधनु रंगरेखा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सौदागर कांदे व उध्दव ढाकणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दगडवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आदर्श शिक्षक सौदागर कांदे हे अनेक उपक्रम राबवत असतात. नाविन्यपूर्ण संकल्पना, स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना मिळेल अशा विविध गोष्टींसाठी ते नेहमीच प्रयत्नशिल असतात. मागिल काळातही सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतीक, आणि कलाविषयक ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या अनुषंगाने अनेक उपक्रम घेतले आहेत. आसाच एक उपक्रम नुकताच शाळेत राबविण्यात आला. यासाठी परभणी येथील इंद्रधनु कला अकादमीने पुढाकार घेवून दगडवाडीच्या शाळेत राज्यास्तरीय चित्रकला स्पर्धा

MB NEWS:तिहेरी अपघात ;दोन जण गंभीर जखमी

इमेज
  तिहेरी अपघात ;दोन जण गंभीर जखमी गेवराई  गेवराई शहरा जवळीत माहामार्गाच्या बाह्यवळनावर तिहेरी अपघात झाला यात दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे  घटने संदर्भात आधिकची माहिती अशी की गेवराई शहरातील बीड रोडवरील बाह्यवळ रस्त्यावर दि 16 रोजी कार , स्कुलबस, व ,दुचाकीचा तिहेरी अपघात झाला या मध्ये दोघे जखमी झाले तर दुचाकी चालकाची प्रक्रती चिंताजनक आहे येथील छत्रपती संभाजी महाराज चौका समोर दि.16रोजी दुपारी 2:30च्या सुमारास आपघात झाला बीड कडून एनडिका विस्टा कार क्र (MH 23AD1620) गेवराईच्या दिशेने येत होती त्यावेळी पाठी मागुन येणाऱी स्कुल बस (MH12 EQ1671)ने कारला धडक दिली यात सुदेवाने कार चालक बचावला असुन गाडीचे मोठे नुकसान झाले परंतू पाठीमागून येणारी दुचाकी क्र.(MH.04DP.7358)ने स्कुल बसला पाठी मागुन जोराची धडक दिली यात दुचाकी स्वार सह सोबत एकजन गंभीर जखमी झाला असुन जखमीला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हालवले आहे सदर दोघे जखमी गढी येथील रहिवासी असल्याची प्राथमीक माहिती आहे घटनेचा पंचनामा पोलीस केला असुन पुढील तपास सुरु आहे

MB NEWS:व्हॉईस ऑफ मीडियाची परळी तालुका कार्यकारणी जाहीर

इमेज
  व्हॉईस ऑफ मीडियाची परळी तालुका कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, कार्याध्यक्ष महादेव गित्ते तर श्रीराम लांडगेंची उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रतिनिधी। बीड (पासपोर्ट 3, लोगो) दि.15 ः राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीची घोषणा करण्यात आली.  या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी स्वानंद पाटील, कार्याध्यक्षपदी महादेव गित्ते, उपाध्यक्षपदी श्रीराम लांडगे, सरचिटणीसपदी अशोक गलांडे, सहसरचिटणीस-अनिल देशमुख, कोषाध्यक्ष- महादेव शिंदे, कार्यवाहक-संतोष जुजगर, प्रसिद्धी प्रमुख-बालाजी ढगे हे आहेत. तर सदस्य म्हणून संजय खाकरे, रविंद्र जोशी, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, प्रकाश चव्हाण,किरण धोंड,दत्तात्रय काळे हे सर्व जेष्ठ पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत.  नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडीबद्दल बीड जिल्हा शाखेचे सरचिट

MB NEWS:३४ वे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध स्पर्धा व उदबोधन शिबीर

इमेज
  ३४ वे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध स्पर्धा व उदबोधन शिबीर  परळी वै.ता.१६ प्रतिनिधी     केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दिनांक १२ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ या कलावधीकरिता आयोजीत केले अहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन २०२३ या वर्षात रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्याने विविध विभागाने विविध कार्यक्रम राबविणे अभिप्रेत आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई च्या वतीने परळी येथील विदयावर्धनी विदयालयात सोमवारी (ता.१६) उदबोधन शिबीर सकाळी ८:३० वा. संपन्न झाले. या उदबोधन शिबीरामध्ये शाळेतील विदयार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विदयालयामध्ये रस्ता सुरक्षा विषयक निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाईतर्फे स्पर्धेत प्रथम आलेल्या विदयार्थ्यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिलीप निळेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये रस्ता सुरक्षा माझी जबाबदारी निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्राप्ती शरद घनचेकर, इयत्ता 8 वी व अनुक्रमे द्वितीय साठी कु. अदिती

MB NEWS:परळी गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी जाहीर अध्यक्षपदी संतोष हळणे तर कार्याध्यक्षपदी मुकेश कांबळे यांची निवड

इमेज
  परळी  गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी जाहीर अध्यक्षपदी संतोष हळणे तर कार्याध्यक्षपदी मुकेश कांबळे यांची निवड परळी प्रतिनिधी   दिनांक 15 जानेवारी 2023 रविवार रोजी परळी वैजनाथ येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली परळीतील  बहुभाषित चर्मकार समाजाची मोठ्या प्रमाणात मीटिंग झाली गेली तीन वर्षापासून भारत देशावर कोविड-19 संकट असल्यामुळे महापुरुषांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही परंतु यावर्षी शासनाकडून सर्व स्तरावर परवानगी असल्यामुळे समाज बांधवांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह होता व थाटामाटा जयंती साजरी करण्याचे ठरले यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्षपदी संतोष हळणे उपाध्यक्ष ऋषी घायाळ व अजय पिंपळे कार्याध्यक्ष मुकेश कांबळे स्वागत अध्यक्ष पांडुरंग साबणे कोषाध्यक्ष संपर्कप्रमुख दत्तात्रय आशेवार कोश अध्यक्ष तुकाराम सोळंके सचिव सतीश शिंदे सहसचिव संदीप वाघमारे संघटक भारत आशेवार सहसंघटक अनिल आशेवार तर सल्लागार म्हणून रोहिदास बनसोडे सुरेश खराटे बाळू धनगे अरुण घायाळ बाळासाहेब सातपुते ब

MB NEWS:बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

इमेज
  बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी एक दिवसाच्या संपावर परळी प्रतिनिधी बँक ऑफ महाराष्ट्र मधील एआयबीईएशी संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनिअन औरंगाबाद या बँक कर्मचारी संघटनाने दिलेल्या संपाची हाक महाराष्ट्र राज्यातील दिनांक १६ जानेवारी रोजी व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने ५० वर्षांपासून संघटनांकडे असलेली कार्यालये जबरदस्तीने हस्तगत केली आहेत त्याच्या विरोधात एक दिवसाच्या निषेध संपाची हाक दिली आहे. या शिवाय बँकेतील सर्व संघटनांनी मिळून स्थापन करण्यात आलेल्या युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनस च्या वतीने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी नोकर भरती, कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व प्रश्नांवर द्विपक्षीय वाटाघाटीतून निर्णय, मनमानी प्रशासकीय बदल्यांना विरोध आदी मागण्यांसाठी २७ जानेवारी आणि ९ आणि १० फेब्रुवारी रोजी संपाची हाक दिली आहे. बॅक तोट्यात होती तेंव्हा कर्मचारी वर्गाने सर्वस्व अर्पण करत बँकेला सुस्थितीत आणले, कोरोना काळात जीवावर उदार होऊन ग्राहकांना सेवा दिल्या पण व्यवस्थापन याची जाणीव न ठेवता कर्मचारी वर्गावर विविध पद्धतीने दबाव आणत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कर्मचारी वर्गावर कामाचा त

MB NEWS: स्व.श्यामराव देशमुख स्मृति समारोहाचे उद्घाटन:प्रभाकर साळेगावकर यांच्या आशयघन कवितेने रसिकांना केले मंत्रमुग्ध

इमेज
  स्व.श्यामराव देशमुख स्मृति समारोहाचे उद्घाटन:प्रभाकर साळेगावकर यांच्या आशयघन कवितेने रसिकांना केले मंत्रमुग्ध परळी, दि. 16/01/2023 (प्रतिनिधी) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या समारोहाचे उद्‌घाटन प्रख्यात विडंबनकार , कवी , विविध दूरचित्रवाहिन्यांवर अनेक कार्यक्रमांचे अनोखे सादरीकरण करणारे मा. प्रभाकरजी साळेगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. नंदकुमार ठाकूर यांच्या वतीने परळीतील संभाजीनगर विभागाचे पो .उ .नि .श्री सुरेशजी चाटे हे या सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष , मा.संजयजी देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे सचिव मा. रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख तसेच  संचालिका सौ . छायाताई देशमुख , सौ .विद्याताई देशमुख , श्री मंगेश देशमुख तसेच मा. हेमंतजी कुलकर्णी , मा. अॅड. गिरीशजी चौधरी , परळीतील नामवंत चिकित्सक डॉक्टर जे . जे .देशपांडे

MB NEWS:नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती

इमेज
  नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती पत्रकार नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या १५ वर्षांपासून नवनाथ बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत, यापूर्वी त्यांनी दैनिक गावकरी, मराठवाडा नेता, स्टार माझा, एबीपी माझामध्ये काम केले आहे. नवनाथ बन यांना माध्यम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असून, ते भाजपची धोरणे व विचारांना पोहचविण्याचे काम करतील. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शुभेच्छा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्या.

MB NEWS:"वैद्यनाथ" मध्ये रस्तासुरक्षा उद्बोधन शिबिर

इमेज
"वैद्यनाथ" मध्ये रस्तासुरक्षा उद्बोधन शिबिर    "अपघात टाळण्यासाठी चालकांनी दक्ष असावे !" ---- परिवहन अधिकारी श्री निळेकर यांचे आवाहन परळी वैजनाथ , दि.१६-             आज-काल दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढत असून ते टाळण्यासाठी वाहनचालकांनी सतत दक्ष व सतर्क राहावे. याकरिता  वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यामुळे स्वतःबरोबरच इतरांचीही जीवितहानी टळू शकते, असे प्रतिपादन जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दिलीप निळेकर यांनी केले.            राज्य शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने आज (दि. १६) येथील वैद्यनाथ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा उद्बोधन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री निळेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही.मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री शेखर आचार्य, परळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पो. नि. श्री मारुती मुंडे, मोटार वाहन निरीक्षक श्री उंबरजे, श्री कांबळे व श्री पारशेट्टी उपस्थित होते.        श्री निळेकर यावेळी म्हणाले- आजकाल म

MB NEWS:हिंदू विवाह कायदानुसार आंतरधर्मीयांनी केलेला विवाह अमान्‍य : सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण

इमेज
  हिंदू विवाह कायदानुसार आंतरधर्मीयांनी केलेला विवाह अमान्‍य : सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निरीक्षण हिंदू विवाह कायद्यांतर्गतील कलमानुसार आतंरधर्मीय व्‍यक्‍तीने केलेला विवाह मान्‍य नाही.  हिंदू धर्मातील व्‍यक्‍तीच हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह करु शकतात, असे निरीक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्‍यात होणार आहे. ( Hindu Marriage Act ) हिंदू विवाह कायदानुसार विवाह केलेल्‍या ख्रिश्चन धर्मीय व्‍यक्‍तीविरोधात हैदराबाद पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणी  तेलंगणा उच्‍च न्‍यायालयाने ऑगस्‍ट २०१७ मध्‍ये दिलेल्‍या निर्णयाविरोधात संबंधित व्‍यक्‍तीने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी ( दि. १३) या याचिकेवर न्‍यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि बी. व्‍ही. नागरथना यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. काय घडलं होतं? ख्रिश्चन धर्मीय व्‍यक्‍तीने फेब्रुवारी २००८ मध्‍ये हिंदू परंपरेप्रमाणे विवाह केला, असा दावा हिंदू तरुणीने केला होता. आमचा विवाह १९५५ हिंदू विवाह कायद्यानुसार झाले होते. मात्र विवाहानंतर संबंधित तरुणाने लग्‍न झालेच नसल्‍या

MB NEWS:सराफा व्यापारी रमेश मुंडलिक धारासुरकर यांच्या वतीने भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा सत्कार

इमेज
  सराफा व्यापारी रमेश मुंडलिक धारासुरकर यांच्या वतीने भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा सत्कार गंगाखेड, प्रतिनिधी....          प्रसिद्ध भागवत कथाकार भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज जोशी उखळीकर यांची सध्या धारासुर येथे भागवत कथा सुरू आहे. या कथेदरम्यान मूळ धारासुर येथील व परळीतील प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश मुंडलिक यांनी कथे दरम्यान महाराजांचा हृदय सत्कार केला.          धारासुर येथे हभप बाळू महाराज जोशी उखळीकर यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परळी येथील सराफा व्यापारी रमेश मुंडलिक हे मूळ धारासुर येथील असून त्यांनी या कथेदरम्यान भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन हृदय सत्कार केला. यावेळी धारासुर येथील भाविक, मित्र मंडळ, गावकरी उपस्थित होते.

MB NEWS:_विधानसभा प्रमुख धनंजय गित्तेंच्या नेतृत्वाखाली स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती सप्ताहाचा शुभारंभ_

इमेज
  बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला'कार्यक्रम   _विधानसभा प्रमुख धनंजय गित्तेंच्या नेतृत्वाखाली स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती सप्ताहाचा शुभारंभ_   *परळी वै:-प्रतिनिधी* बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने येथील गणेशपार भागात मकर संक्राती निमित्ताने  तिळ गुळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. हिन्दु-हदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने परळीत 15 ते 23 जानेवारी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन सप्ताह साजरा करण्यात येणार असुन आज परळी विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या हस्ते आज तिळ गुळ वाटत करुन शुभारंभ करण्यात आला.      महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खा श्रीकांत शिंदे,खा.गजानन कीर्तिकर, मुख्य सचिव संजय मोरे,सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख सचिन मुळूख यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वात परळी  शहरात हिन्दु-हदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने 15 ते 23 जानेवारी दरम्यान विविध सामाजिक उपक्रम घेऊन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये शालेय साहित्य वाटप,आरोग्य शिबिर,रुग्णांना

MB NEWS:निखळ शिल्पकार*! *मधूकर गिरवलकर सर

इमेज
  निखळ शिल्पकार*! *मधूकर  गिरवलकर  सर ............................................................     "   सुंदर आयुष्य सहज घडत नसतं.        तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं,        ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून,       त्यागातून आणि सर्वात महत्वाचे       म्हणजे कृतीतून घडतं असतं." वरील ओळी अतिशय चपखलपणे परळी शहरातील विविध शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे अधिष्ठान असणाऱ्या  शहरातील    शिक्षक  मधुकर चनबसअप्पा  गिरवलकर  सरांना लागू पडतात.  वीरभद्रेश्वर  विघालयाचे   मुख्याध्यापक  आहेत. ते मुळ पुस येथील  राहिवासी  आहेत. वडील सनबस  अप्पा  गिरवलकर  सर शिक्षक व शिवसेनेने  नेते असल्याने परळीला  वास्तव्यास  आले.  परळी शहरातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्या काळात कै चनबसअप्पा  गिरवलकर  यांचे सामाजीक,  राजकीय  क्षेत्रात   मोलाचे योगदान आहे.  त्यांनी आपल्या  हातून जे जे समाजासाठी  करता येईल ते कार्य  केले. गरजू लोकांना मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. परंतु केलेली मदत ते कधीही तोंडातून बोलून दाखवत नाहीत.           ' नेकी कर दर्या मे डाल '  या म्हणीप्रमाणे  आपल्या वडिलांचा द

MB NEWS:"थोडक्यात वाचले..." ; साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया!

इमेज
  "थोडक्यात वाचले..." ; साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया! पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यात घडली. हिंजवडीच्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला.  खासदार सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. दैनंदिन कार्यक्रम देखील त्यांनी त्याच साडीत सुरु ठेवला.  सुप्रिया सुळे म्हणाल्या, थोड दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, सगळे आम्ही मुळशीला कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. यावेळी तिथे मेनबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीने पटकन पेट घेतला. ते आमच्या लगेच लक्षात आलं. त्यानंतर सगल कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही. पुणे येथील मुळशी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेस उद्घाटन सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विझवली. दै

MB NEWS:मडव कंसल्टन्सी तयार करणार प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास प्रकल्पाची संकल्प पत्रिका

इमेज
  मडव कंसल्टन्सी तयार करणार प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास प्रकल्पाची संकल्प पत्रिका परळी वैजनाथ (प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकार तथा अनेक देवस्थान तसेच विविध पर्यटन विकास कामांत सल्लागार असलेली मडव कंसल्टन्सी प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास प्रकल्पची संकल्प पत्रिका तयार करणार आहे. प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व मडव कंसल्टन्सी यांच्या शिष्टमंडळाची येथील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात एक प्राथमिक बैठक झाली. त्या आधी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन बैठक पार पडली. यात प्रामुख्याने प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉरमध्ये कोणकोणते लोकोपयोगी उपक्रम असावेत याबाबत उहापोह करण्यात आला. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे; १. कॉरिडॉरमध्ये प्रभू वैद्यनाथाबाबत असलेल्या पौराणिक कथा, आख्यायिका, इतिहास यांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने परळी वैजनाथ परिसरात जागोजागी त्यानुसार शिल्पे बसवण्यात यावी. २. एम्ससारखे सुसज्ज हॉस्पिटल / सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल. ३. मेरू गिरी पर्वत रांगांमध्ये बोटॅनिकल / आयुर्वेदिक वानुस्पत्युद्यान. ४. आंतरराष्ट्रीय योग साधना / विपश्यना केंद्र. ५. भगवान शंकरांचे वाहन नंदी आहे त्यामुळे १० हजार गोवंश क्षमतेची गोशाळा

MB NEWS:शेगाव येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात परळीतील ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांचा सहभाग

इमेज
  शेगाव येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात परळीतील ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांचा सहभाग                 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शेगाव येथे विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराज शेगाव शहरात ५७ वे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.                                                     ५७ वे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन १४ ते १५ जानेवारी रोजी शेगाव येथे संपन्न झाले. ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात परळी येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल बसलिंगअप्पा ओपळे, डॉ.भालचंद्र वाचनालयाचे प्रभारी ग्रंथपाल गंगाधर जगतकर, ज्ञानपीठ सार्वजनिक वाचनालयाचे सचिव बंकट उपाडे, कै. लक्ष्मणराव शामराव मुंडे वाचनालयाचे ग्रंथपाल नागनाथ पारधे, नागनाथ सार्वजनिक वाचनालय सर्जेराव सोळंके, श्रीराम सार्वजनिक वाचनालय वानटाकळी ताडाचे ग्रंथपाल बालासाहेब राठोड, महादेव गिते व इतर उपस्थित होते.

MB NEWS-मयत बांधकाम कामगाराच्या वारसास बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळाले दोन लाख रुपये -प्रा. खाडे बी.जी. यांची माहिती

इमेज
  मयत बांधकाम कामगाराच्या वारसास बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळाले दोन लाख रुपये -प्रा. खाडे बी.जी. यांची माहिती   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          परळी येथील बांधकाम कामगार हसन छोटुमिया शेख यांचे 7 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झाले होते. त्यांच्या वारसदार पत्नी मैमुनाबी यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून दोन लाख रुपयाची मदत मिळाली असल्याची माहिती बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.खाडे बी.जी. यांनी दिली आहे.            तसेच त्यांना पुढील पाच वर्ष 24 हजार रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार आहेत. दोन लाख रुपयाची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मदत ताबडतोब मिळावी यासाठी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.खाडे बि.जी. व बांधकाम कार्यकर्ते शेख जावेद यांनी प्रयत्न केले तसेच बीडचे जिल्हा कामगार अधिकारी एस. ए. मुंडे व कर्मचारी रेणुके यांनी तात्काळ कार्यवाही करून मदत मिळवून दिली. यापूर्वीही अपघातात मृत पावलेल्या शेख इसाक या बांधकाम कामगाराच्या वारसाला बीड जिल्हा कामगार संघटनेने पाच लाख रुपये मिळवून दिले आहेत. बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळात आपले नाव नोंदवावेत

MB NEWS:शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाड ठरला उपविजेता

इमेज
  शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाड ठरला उपविजेता    मूळचा राजगुरूनगर, पुणे येथील रहिवासी आणि नांदेड संघातून उतरलेला शिवराज राक्षे याने मंगळवेढा, सोलापूरचा महेंद्र गायकवाड याला चितपट करीत ६५व्या महाराष्ट्र केसरिचा ‘किताब पटकावला. महेंद्र गायकवाड ला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत उत्कंठा निर्माण करणाऱ्या – लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले. चांदीची गदा, पाच लाख रुपये रोख आणि महिंद्रा कंपनीची थार गाडी भेट म्हणून देण्यात आली. उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला चांदीची गदा, अडीच लाख रुपये रोख आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली. गादी विभागात राक्षे तर माती विभागात गायकवाड विजेता तत्पुर्वी झालेल्या माती विभागातील अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सोलापुरच्या सिकंदर शेखचा अटीतटीच्या लढतीत ६ विरुद्ध ४ गुणांनी पराभव

MB NEWS:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे येणार गहिनीनाथ गडावर ?

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे येणार गहिनीनाथ गडावर ? बीड:   उद्या म्हणजे 15 जानेवारीला  देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.            दोन आठवड्यामध्ये दोनदा फडणवीस हे बीडला येत आहेत. एक जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि उद्या गहिनीनाथ गडावर होणाऱ्या संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास ते हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या गहिनीनाथ गडाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे ही उपस्थित राहणार  आहेत. 

MB NEWS:३४ वे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन

इमेज
  ३४ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन अंबाजोगाई ता.१४ प्रतिनिधी केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ या कलावधीकरिता आयोजीत केले आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन २०२३ या वर्षातील रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्याने विविध विभागाने विविध कार्यक्रम राबविणे अभिप्रेत आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविदयालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक ११ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण महाविदयालयातील सभागृहात सकाळी ९:३० वा. उदघाटनपर समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर पवार मॅडम यांच्या हस्ते आणि उप प्राचार्य डॉ. श्री. आर. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी मंच्यावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. दिलीप निळेकर, श्री विनोद घोळवे पोलीस निरिक्षक, अंबाजोगाई (ग्रामीण) हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय छात्र सेना चे विदयार्थी व महाविदयालयीन विदयार्थी, उप प्रादेशिक परिवहन कार

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.           शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, डॉ विनोद जगतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नामविस्तार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ विनोद जगतकर यांनी नामविस्तार करण्यासाठी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधानसभेत ठराव मंजूर केला होता. पण नामविस्तारास विरोध झाल्याने तो ठराव रद्द झाल्याने आंबेडकरी जनतेने मोठे आंदोलन उभारले यासाठी तब्बल१७ वर्षे लढा लढल्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आल्याचे डॉ जगतकर यांनी सांगितले. तर अध्यक्षीय समारोप संजय

●17 रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार बैठक

इमेज
 ■किसान सभेच्या धरणे आंदोलनाची दखल ●17 रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार बैठक परळी / प्रतिनिधी अतिवृष्टी नुकसान मदत, पिकविमा वितरण निर्दोष व पारदर्शक करावे यासह शेतक-यांच्या इतर मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेने 9 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या धरणे आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून किसान सभेच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात 17 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. सोमवार दि 9 जानेवारी रोजी बीडच्या अखिल भारतीय किसान सभेने खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ रोजी जिल्हा कचेरीवर बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने धरणे आंदोलन केले होते.या निदर्शनाची दखल घेतली असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेने केलेल्या विविध मागण्या व शेत