MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा




परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

          शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, डॉ विनोद जगतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नामविस्तार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ विनोद जगतकर यांनी नामविस्तार करण्यासाठी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधानसभेत ठराव मंजूर केला होता. पण नामविस्तारास विरोध झाल्याने तो ठराव रद्द झाल्याने आंबेडकरी जनतेने मोठे आंदोलन उभारले यासाठी तब्बल१७ वर्षे लढा लढल्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आल्याचे डॉ जगतकर यांनी सांगितले. तर अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. सुत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार प्रा.डॉ कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !