इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला 'लग्नाच्‍या बेडीत'!

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला 'लग्नाच्‍या बेडीत'!


       
 पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कराचीमधील एका पाकिस्तानी महिलेशी लग्‍न केले आहे. यासंदर्भातील माहिती दाऊद इब्राहिमच्या भाच्याने दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिलेल्या माहितीत डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने दिली आहे.

हसीना पारकरच्‍या मुलाची ‘एनआयए’ला माहिती

दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने ‘एनआयए’ दिलेल्‍या माहितीत सांगितले आहे की, दाऊद इब्राहिम याने दुसरे लग्न केले  आहे. त्‍याने अद्याप पहिली पत्नी मेहजाबीन शेख हिला घटस्फोट दिलेला नाही. एनआयएने धडक कारवाई करत  दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित लोकांना अटक केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्रही सादर केले होते.

अली शाहने ‘एनआयए’ला सांगितले आहे की, दाऊद इब्राहिमने अद्याप त्याची पहिली पत्नी मेहजाबीन शेखला घटस्फोट दिलेला नाही. दाऊदचे दुसरे लग्न म्हणजे मेहजाबीनवरून तपास यंत्रणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.
जुलै 2022 मध्ये दाऊद इब्राहिम याने पहिल्या पत्नीची दुबईमध्ये भेट घेतल्‍याची माहिती समोर आली होती.

मेहजाबीन शेख भारतातील दाऊदच्या नातेवाईकांशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क ठेवत असल्याचेही तपासात स्‍पष्‍ट झाले होते. हसीना पारकरचा मुलगा अली शाह याने अंडरवर्ल्ड डॉन आता कराचीमध्ये असल्याची माहितीही ‘एनआयए’ला दिली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!