MB NEWS:३४ वे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन

 ३४ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन



अंबाजोगाई ता.१४ प्रतिनिधी


केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ या कलावधीकरिता आयोजीत केले आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन २०२३ या वर्षातील रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्याने विविध विभागाने विविध कार्यक्रम राबविणे अभिप्रेत आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविदयालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक ११ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण महाविदयालयातील सभागृहात सकाळी ९:३० वा. उदघाटनपर समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर पवार मॅडम यांच्या हस्ते आणि उप प्राचार्य डॉ. श्री. आर. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी मंच्यावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. दिलीप निळेकर, श्री विनोद घोळवे पोलीस निरिक्षक, अंबाजोगाई (ग्रामीण) हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय छात्र सेना चे विदयार्थी व महाविदयालयीन विदयार्थी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाती अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे मालक, मोठया प्रमाणात उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महादेव कांबळे सहा. मोटार वाहन निरिक्षक यांनी केले. व आभार प्रदर्शन श्री. शेखर आचार्य मोटार वाहन निरिक्षक यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार