MB NEWS:३४ वे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध स्पर्धा व उदबोधन शिबीर

 ३४ वे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध स्पर्धा व उदबोधन शिबीर 



परळी वै.ता.१६ प्रतिनिधी


    केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दिनांक १२ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ या कलावधीकरिता आयोजीत केले अहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन २०२३ या वर्षात रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्याने विविध विभागाने विविध कार्यक्रम राबविणे अभिप्रेत आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई च्या वतीने परळी येथील विदयावर्धनी विदयालयात सोमवारी (ता.१६) उदबोधन शिबीर सकाळी ८:३० वा. संपन्न झाले.


या उदबोधन शिबीरामध्ये शाळेतील विदयार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विदयालयामध्ये रस्ता सुरक्षा विषयक निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाईतर्फे स्पर्धेत प्रथम आलेल्या विदयार्थ्यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिलीप निळेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये रस्ता सुरक्षा माझी जबाबदारी निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्राप्ती शरद घनचेकर, इयत्ता 8 वी व अनुक्रमे द्वितीय साठी कु. अदिती राजेभाऊ शिंदे, चि. यश दिपक रेनगडे, कु. वेदांती आदुडे, कु. शुभांगी केंद्रे तसेच घोषवाक्य स्पर्धेत प्रथम कु. सिध्दी पिसे, द्वितीय चि. सार्थक घनचेकर तृतीय कु. गौरी सोमाणी, उत्तेजनार्थ कु. समिक्षा भोयटे, कु. सेजल पवार आदींने पारितोषक पटकावले. यावेळी विदयावर्धनी विदयालयाचे संचालक श्री. भिंगोरे सर मुख्याध्यापक श्री. माथेकर सर, सुमठाणे सर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक श्री. शेखर आचार्य श्री. विनोद उंबरजे, श्रीमती. साधना दुधमले व कार्यालयातील इतर सहा मोटार वाहन निरिक्षक व कर्मचारी श्री. संजय शेळके श्री. राहुल बळवंत उपस्थित होते. निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यासाठी श्री. दादाराव सुर्यवंशी सर यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शरद घनचेकर यांनी केले. तसेच वैदयनाथ महाविदयालय, परळी येथे उदबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पॉवर पॉईन्ट प्रझनटेशनदवारे रस्ते अपघात व रस्ता सुरक्षा विषयक महाविदयालयीन विदयार्थी / विदयार्थीनींना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मंच्यावर उपस्थित महाविदयालयाचे प्राचार्य श्री. मेश्राम सर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. दिलीप निळेकर कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?