इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतूनश्रीमद् भागवत कथामालेचे आयोजन !

हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतूनश्रीमद् भागवत कथामालेचे आयोजन !



बीड – येथील श्रीमद् भागवत कथा संयोजन समितीच्या वतीने आणि विविध धार्मिक संस्थांच्या सहभागाने सद्गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमोघ वानीतून 5 फेब्रुवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधी दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक अलौकिक सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बीडमध्ये राम कृष्ण लॉन्स मंगल कार्यालयातील वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न धोंडीराज शास्त्री महाराज पटांगणकर नगरी मध्ये या भागवत कथेच्या आयोजन करण्यात आले असून शुभारंभ प्रसंगी ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर ,अमृता आश्रम महाराज, योगीराज गोसावी महाराज पैठण यांची उपस्थित राहणार असून समारोप करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे .

या सात दिवसात दरम्यान विविध संस्थांचे महाराज संत उपस्थित राहणार असून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे कथा स्थानी आरोग्य शिबीरही सात दिवस चालणार असून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली असून शहरात आणि जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या कथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!