●17 रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार बैठक

 ■किसान सभेच्या धरणे आंदोलनाची दखल



●17 रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार बैठक


परळी / प्रतिनिधी


अतिवृष्टी नुकसान मदत, पिकविमा वितरण निर्दोष व पारदर्शक करावे यासह शेतक-यांच्या इतर मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेने 9 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या धरणे आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून किसान सभेच्या विविध मागण्या निकाली काढण्यासंदर्भात 17 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.


सोमवार दि 9 जानेवारी रोजी बीडच्या अखिल भारतीय किसान सभेने खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ रोजी जिल्हा कचेरीवर बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने धरणे आंदोलन केले होते.या निदर्शनाची दखल घेतली असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेने केलेल्या विविध मागण्या व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत दि.17 जानेवारी रोजी दुपारी 1 वा जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात बैठक  आयोजीत केली आहे.


या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता महावितरण व उप कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व किसान सभेचे शिस्टमंडळ उपस्थित असणार आहे.सदर बैठकीस आवश्यक त्या अद्यावत माहितीसह व्यक्तीशः उपस्थित राहावे असे आदेश निवासी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार