MB NEWS:इंद्रधनु कला आकादमी, परभणी यांचा उपक्रम

 दगडवाडीत रंगली इंद्रधनु रंगरेखा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा




इंद्रधनु कला आकादमी, परभणी यांचा उपक्रम


परळी (प्रतिनिधी)


परळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दगडवाडी येथे इंद्रधनु कला आकादमीच्या वतीने इंद्रधनु रंगरेखा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सौदागर कांदे व उध्दव ढाकणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.


ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दगडवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आदर्श शिक्षक सौदागर कांदे हे अनेक उपक्रम राबवत असतात. नाविन्यपूर्ण संकल्पना, स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना मिळेल अशा विविध गोष्टींसाठी ते नेहमीच प्रयत्नशिल असतात. मागिल काळातही सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतीक, आणि कलाविषयक ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या अनुषंगाने अनेक उपक्रम घेतले आहेत. आसाच एक उपक्रम नुकताच शाळेत राबविण्यात आला. यासाठी परभणी येथील इंद्रधनु कला अकादमीने पुढाकार घेवून दगडवाडीच्या शाळेत राज्यास्तरीय चित्रकला स्पर्धा नुकतीच घेतली. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच होता. यासाठी पुढाकार घेतलेले आदर्श शिक्षक सौदागर कांदे आणि उध्दव ढाकणे यांचे मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी विशेष आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !